स्प्लिट एंड्स म्हणजेच केसांना फाटे फुटणे. केसांचे हे तुटलेले टोक दोन अथवा अधिक भागांमध्ये विभाजित होतात. स्काल्पमध्ये कोरडेपणा, केसांमध्ये पोषणची कमतरता. यासह अनेक कारणांमुळे ही परिस्थिती उद्भवते. अशा परिस्थितीत लोकं स्प्लिट एंड्स कापून टाकतात. मात्र, हा उपाय कायम प्रभावी ठरेल असे नाही. यासाठी केसांची योग्य निगा राखणे आवश्यक.
केसांना योग्यरित्या शॅम्पू न लावल्यामुळे देखील फाटे फुटतात. बऱ्याच महिला शॅम्पू लावताना एक चूक करतात. ती चूक म्हणजे महिला स्काल्पवर शॅम्पू न लावता केसांच्या मुळापर्यंत लावतात. ज्यामुळे केस कोरडे व निर्जीव दिसू लागतात.
यासंदर्भात अभिनेत्री व लाईफस्टाईल व्हिडिओ मेकर उर्मिला निंबाळकर हिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने या व्हिडिओद्वारे शॅम्पू लावण्याची योग्य पद्धत शेअर केली आहे. यासह तिने केसांमध्ये स्प्लिट एंड्स होण्यामागची कारणे देखील सांगितली आहे.
शॅम्पू लावण्याची योग्य पद्धत
बऱ्याच महिला जास्त करून केसांच्या टोकापर्यंत शॅम्पू लावतात. ही प्रक्रिया चुकीची आहे. आपल्या स्काल्पवर डेड स्किन, कोंडा, धूळ - प्रदूषण, तेलकट थर, जमा होते. ते काढण्यासाठी शॅम्पू स्काल्पवर लावा. मात्र, शॅम्पू केसांच्या टोकापर्यंत लावू नये. कारण, शॅम्पू केस धुताना केसांच्या टोकापर्यंत येतो. त्याची खरी गरज स्काल्पवर असते. टोकांना लावल्यानंतर केस निर्जीव व कोरडे पडतात.
केस जास्त वेळ धुवू नका
केसांची स्वच्छता यासह टाळू निरोगी ठेवणे आवश्यक. मात्र, वारंवार केस धुणे चुकीचे आहे. वारंवार केस धुतल्यामुळे स्काल्पवरील नैसर्गिक तेल निघते. ज्यामुळे केस कोरडे होतात. याचा थेट परिणाम केसांच्या टोकांपर्यंत दिसून येते. ज्यामुळे स्प्लिट एंड्स होऊ शकतात.
केमिकल अथवा कलरचा वापर टाळा
केस कोरडे होण्यामागचे कारण केमिकल प्रोडक्ट्स देखील असू शकतात. अनेकदा आपण केसांना कलर अथवा इतर प्रोडक्ट्स लावतो. काही प्रोडक्ट्स स्काल्पवर सूट करतात तर, काही नाही. या रासायनिक प्रोडक्ट्समुळे केसांचे अधिक नुकसान होते. ज्यामुळे केस कमकुवत होतात.
ओव्हर ब्रश करणे टाळा
केसांसाठी शॅम्पू करणे, केस विंचरणे आणि ब्रश करणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे त्याचा अतिरिक्त वापर धोकादायक ठरू शकते. ओव्हर ब्रश केल्याने केस आतून तुटू शकतात. त्यामुळे केसांना ओव्हर ब्रश करू नका.