तांदुळाचा वापर करुन त्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. परंतु याच तांदुळाचा वापर आपण आपल्या स्किनकेअर रुटीनमध्ये देखील करु शकतो. तांदुळाचा वापर बऱ्याच काळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जात आहे. तांदूळ आहारासोबतच त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील वापरला जातो. आपल्या त्वचेला तांदळापासून अनेक फायदे मिळतात. स्किनसाठी फेसपॅक आणि फेसमास्क बनवताना आपण तांदुळाचा देखील वापर करु शकतो. त्यामुळे, तांदूळ हा आहारासोबतच आपल्या त्वचेच्या सौंदर्यामध्येही भर घालतो(These 5 ways to use rice for skin).
त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते. किचनमध्ये असणारे बेसन, हळद, तांदळाचे पीठ अशा पदार्थांचा वापर स्किन केअर रुटीनमध्ये केला जातो. ज्याच्या वापराने आपल्या सौंदर्यात भर तर पडतेच शिवाय स्किन देखील यंग आणि ग्लोइंग दिसण्यात मदत होते. स्किनसाठी तांदूळ धुतलेल्या पाण्यापासून ते तांदुळाच्या पीठापर्यंत सगळ्याच गोष्टींचा वापर करणे फायदेशीर ठरते. स्किनसाठी तांदुळाचा वापर नेमका कसा करावा ते पाहुयात( 5 Amazing ways to use rice for skin care).
स्किनसाठी तांदुळाचा या ५ प्रकारे वापर करणे ठरेल फायदेशीर...
१. तांदुळाचे पाणी :- तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी आपण फेकून देतो त्याचा वापर स्किनसाठी टोनर म्हणून करु शकतो. तांदुळाचे पाणी हे स्किन ग्लोइंग बनवण्यासाठी अतिशय फायदेशीर असते. त्वचेसाठी ते एक सर्वोत्तम स्किन टोनर म्हणून प्रभावीपणे काम करते. तांदुळाच्या पाण्याचे टोनर बनवण्यासाठी, सगळ्यांतआधी तांदूळ ५ ते ७ वेळा चांगले धुवून घ्यावेत. जेणेकरून त्यातील सर्व घाण आणि धूळ निघून जाईल. तांदूळ धुण्याआधी थोडा वेळ भिजवून ठेवावेत जेणेकरून ते धुणे सोपे होईल. तांदूळ धुतल्यानंतर त्याचे जे पाणी आहे ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन ठेवावे, यात आपण गुलाबपाणी देखील मिक्स करु शकता. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर आपण हे पाणी चेहऱ्यावर स्प्रे करु शकता.
२. तांदुळाचा फेसमास्क :- तांदुळाचा फेसमास्क बनवण्यासाठी २ टेबलस्पून तांदुळाच्या पिठात १ टेबलस्पून मध आणि थोडेसे दूध घालून त्याची पातळसर पेस्ट बनवून घ्यावी. हा तांदुळाच्या पिठापासून तयार झालेला स्किन ब्राइटनिंग फेसमास्क स्किन ग्लोइंग आणि ब्राईट करण्यासाठी फायदेशीर ठरतो.
रोज सकाळी ५ मिनिटं या ५ पदार्थांनी चेहऱ्याला करा मसाज, चाळीशी उलटली तरी चेहरा चमकेल...
३. तांदुळाचा स्क्रब :- तांदुळाचा स्क्रब बनवण्यासाठी २ टेबलस्पून तांदुळाच्या पिठात १ टेबलस्पून एलोवेरा जेल घालून त्याचे स्क्रबर तयार करुन घ्यावेत. मुरुम, पिग्मेंटेशन आणि सुरकुत्यांची समस्या असल्यास आपण हे स्क्रब नक्की वापरू शकता.
४. तांदुळाचे आईस क्यूब :- तांदूळ धुवून त्याचे उरलेले पाणी एका बर्फाच्या ट्रे मध्ये घालून तो ट्रे फ्रिजरमध्ये ठेवून द्यावा. या पाण्याचे आईस क्युब्स तयार होतील. जेव्हा तुमचा चेहरा डल, निस्तेज किंवा स्किन काळवंडली असले तेव्हा हे आईस क्युब्स काढून चेहऱ्यावर फिरावे. यामुळे त्वचेला आराम मिळतो.
५. तांदुळाच्या पाण्याचे जेल :- २ टेबलस्पून तांदुळाच्या पाण्यांत २ टेबलस्पून एलोवेरा जेल मिक्स करून सिरम सारखे पातळ मिश्रण तयार करावे. या राईस फेस ब्राइटनिंग जेलने चेहऱ्याला नेहमी मसाज केल्यास स्किन ग्लोइंग होण्यास मदत मिळते.