Join us  

Use Of Sugar For Skin: काळे डाग होतील छुमंतर आणि चेहरा चमकदार! ४ पद्धतीने करा साखरेचा वापर, बघा कमाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 5:48 PM

Beauty Tips For Glowing Skin: चेहऱ्यावरचे काळे डाग घालविण्यापासून ते चेहरा चमकदार करेपर्यंत साखर अतिशय उपयुक्त ठरते.... पण यासाठी साखरेसोबत इतर कोणता पदार्थ घ्यायला हवा आणि त्याचं प्रमाण किती असावं, हे मात्र अचूक ठाऊक हवं.. 

ठळक मुद्देहे सगळेच उपाय अगदीच सोपे आणि चटकन होणारे आहेत. यासाठी तुम्हाला खूप वेळ घालविण्याची अजिबातच गरज नाही..

चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी करणं, पिंपल्स येऊन गेल्यानंतरही पुढचे कित्येक महिने चेहऱ्यावर दिसून येणारे काळे डाग घालविणं, डेड स्किन काढून टाकणं आणि चेहरा चमकदार ठेवणं.. यासारख्या अनेक गोष्टींसाठी आपल्या स्वयंपाक घरात अगदी सहज उपलब्ध होणारी साखर अतिशय कामी येते.. पण कोणता उपाय करण्यासाठी साखरेचं (use of sugar for skin) कुणासोबत कॉम्बिनेशन करावं हे मात्र त्यासाठी पक्क माहिती असायला हवं...

 

तुमच्या चेहऱ्याची नेमकी कोणती समस्या आहे आणि साखरेचा वापर करून ती समस्या कशी कमी करायची, याची ही सविस्तर माहिती नक्की वाचा... या ब्यूटी टिप्सइन्स्टाग्रामच्या daily__healthtips या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आल्या आहेत. हे सगळेच उपाय अगदीच सोपे आणि चटकन होणारे आहेत. यासाठी तुम्हाला खूप वेळ घालविण्याची अजिबातच गरज नाही.. फक्त उपाय सुरू केल्यानंतर ते नियमित करा आणि स्वत:च त्वचेमध्ये होणारा बदल अनुभवा.. 

 

चमकदार त्वचेसाठी अशा पद्धतीने वापरा साखर..(sugar for glowing skin)१. चेहऱ्यावर चमक हवी असल्यास दही- साखर हा अतिशय उत्तम पर्याय आहे.. त्यामुळे आता दही- साखर फक्त खाऊच नका, चेहऱ्यालाही लावा. २ चमचे दही आणि १ चमचा साखर एका वाटीत एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. गोलाकार दिशेने मसाज करा आणि १५ मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका. २. चेहऱ्यावरचे काळे डाग घालविण्यासाठी साखर आणि लिंबाचा रस हे मिश्रण अतिशय उपयुक्त ठरतं. यासाठी अर्धा टेबलस्पून साखर आणि १ टेबलस्पून लिंबाचा रस एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा आणि १० मिनिटांची चेहरा धुवून टाका.

 

३. डेड स्किन काढून टाकण्यासाठी साखर आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून लावा. हे दोन्ही पदार्थ सम प्रमाणात घ्या. व्यवस्थित एकत्र करून चेहऱ्याला हलक्या हाताने १० मिनिटे मसाज करा. त्यानंतर चेहरा धुवून टाका.४. त्वचा नितळ आणि तजेलदार व्हावी म्हणून साखर, बदामाचं तेल, कॉफी आणि मध हे पदार्थ समप्रमाणात घ्या. त्याची पेस्ट करा आणि त्याने चेहऱ्याला मसाज करा.. हा उपाय स्ट्रेचमार्क घालविण्यासाठीही करता येईल, असं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीइन्स्टाग्रामहोम रेमेडी