आपली त्वचा नेहमी तरुण, चमकदार आणि मुलायम राहावी असे अनेकांना वाटत असते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण नेहमी विविध उपाय ट्राय करतो. याचबरोबर, वेगवेगळ्या ब्यूटी कॉस्मेटिक्सचा वापर देखील करतो. परंतु या महागड्या ब्यूटी कॉस्मेटिक्सचा वापर करण्यापेक्षा काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून देखील त्वचेच्या सौंदर्यात भर पाडू शकतो. नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्याने त्वचेचे आरोग्य व सौंदर्य यात सुधारणा होण्यास सुरुवात होते. विशेषतः फळं आणि भाजीपाला यांच्या साली आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात(Homemade fruit face pack).
फळे व भाज्या रोज खाण्यासोबतच त्यांच्या सालीचाही समावेश तुमच्या त्वचेची निगा राखण्यासाठी केला जाऊ शकतो. अशी काही फळे आहेत जी केवळ चवीलाच अप्रतिम नाहीत तर आरोग्य आणि त्वचा या दोन्हींसाठी खूप (Face Masks for Every Skin Type and Concern) फायदेशीर असतात. या फळांच्या सालींमुळे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य अनेक पटींनी वाढू शकते. या फळांच्या सालीमध्ये असे गुणधर्म असतात जे तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करतात. यासाठीच त्वचेच्या प्रकारांनुसार, कोणती फळं आपण वापरु शकतो ते पाहूयात(Fruit Face Masks Can Make Your Skin GLOW).
१. कोरड्या त्वचेसाठी फेसपॅक...
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर एवोकॅडो आणि केळीच्या सालींचा फेसपॅक बनवा. एवोकॅडो आणि केळीच्या सालीमध्ये आढळणारी जीवनसत्त्वे आणि नैसर्गिक तेल त्वचेचा कोरडेपणा दूर करतात. याशिवाय मध तुमच्या त्वचेला आर्द्रताही पुरवतो. फेसपॅक बनवण्यासाठी एवोकॅडो आणि केळ्याची साल बारीक करून त्याची स्मूद पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये मध घालून मिक्स करा. आता हा मास्क तुमच्या चेहऱ्यावर लावा. यानंतर २० ते २५ मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा.
डोळ्यांवर कुणी पॅक लावते? लावा नॅचरल घरगुती आय पॅक, डोळे दिसतील सुंदर-जळजळही होईल कमी..
२. तेलकट त्वचेसाठी फेसपॅक...
काकडी व लिंबाच्या सालींचा वापर करून तेलकट त्वचेसाठी फेसपॅक बनवू शकता. काकडीच्या सालीने त्वचेला थंडावा तर मिळतोच पण त्वचेतील तेलही कमी होते. त्याचबरोबर, लिंबाच्या सालीमध्ये सायट्रिक ऍसिड असते जे त्वचेतील अतिरिक्त तेल उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय दह्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे स्किन पोर्स घट्ट होतात. फेसपॅक बनवण्यासाठी काकडी आणि लिंबाची साल बारीक करून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये दही घालून मिक्स करा. चेहरा आधी स्वच्छ धुवून घ्या तयार केलेला मास्क चेहऱ्यावर लावा. सुमारे १५ ते २० मिनिटे हा मास्क चेहऱ्यावर तसाच ठेवून द्या. सगळ्यात शेवटी, आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा.
केसांना शाम्पू व कंडिशनर दोन्हींचे पोषण देणारा आजीबाईच्या बटव्यातील खास उपाय...
३. कॉम्बिनेशन स्किनसाठी फेसपॅक...
कॉम्बिनेशन स्किनसाठी गाजर आणि बटाट्याच्या सालीच्या मदतीने फेसपॅक बनवता येतो. गाजराच्या सालीमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेचा रंग संतुलित करतात. त्याचबरोबर, बटाट्याची साल त्वचा उजळण्यास आणि काळे डाग कमी करण्यास मदत करते. गाजर आणि बटाट्याच्या साली एकजीव होईपर्यंत त्यांची पेस्ट करून घ्यावी. आता या पेस्टमध्ये दही मिक्स करा. ही तयार पेस्ट चेहेऱ्यावर लावा. साधारण १५ ते २० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.