दिवाळीमध्ये छान दिसावं, चेहरा तजेलदार व्हावा, असं सगळ्यांनाच वाटतं. मग त्यासाठी आपण दिवाळी (Skin care tips for diwali) आली की फेशियल, क्लिनअप असे काही काही सौंदर्योपचार करून घेतो. पण असे वरवरचे उपाय करून मिळणारा परिणामही तात्पुरता असतो. त्यापेक्षा आपण थोडे दिवस आहारात काही बदल केला किंवा काही पदार्थ आवर्जून घेतले तर त्याचा खूप चांगला परिणाम चेहऱ्यावर, त्वचेवर दिसून येऊ शकतो. त्यामुळेच चेहऱ्यावर नॅचरल ग्लो (diet tips for glowing skin) येण्यासाठी कोणते पदार्थ खावेत, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी शेअर केली आहे.
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी..
१. मंजिरी यांनी सांगितलेला हा एक खास उपाय करून बघितल्यास चेहरा नैसर्गिक पद्धतीने उजळ, चमकदार होण्यास निश्चितच मदत मिळेल. शिवाय हा उपाय अतिशय सोपा, स्वस्त आणि अगदी हेल्दी आहे. त्यामुळे हा उपाय करण्यासाठी थोडे पैसे खर्च झाले तरी त्याचा तुमच्याच आरोग्याला खूप फायदा होणार हे नक्की.
काठापदराच्या जुन्या साड्या नेसून कंटाळा आला? बघा साड्यांचे ड्रेसचे ८ पॅटर्न, दिवाळीसाठी सुंदर ड्रेस
२. व्हिडिओमध्ये त्या सांगत आहेत की चेहऱ्याला चमक आणण्यासाठी सायट्रस प्रकारातली फळं खूप उपयुक्त ठरतात. या प्रकारच्या फळांमध्ये संत्री, मोसंबी, आवळा आणि डाळिंब या फळांचा सहभाग आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत तरी दररोज यापैकी एखादं फळ आवर्जून खा. त्यामुळे त्वचा नैसर्गिक पद्धतीने चमदार होण्यास मदत होईल.
चेहऱ्याला लावा नॅचरल स्क्रब
१. चेहऱ्याचा पोत सुधारण्यासाठी, त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी आपण स्क्रबिंग करतो.
बटन दाबलं की गरमागरम इडली हातात... आहे की नाही जादू, बघा इडलीचं एटीएम, व्हिडिओ व्हायरल
२. यासाठी मंजिरी यांनी एक नैसर्गिक स्क्रबचा सोपा पर्याय सुचवला आहे.
३. गव्हाचा कोंडा आणि दही हे मिश्रण एकत्र कालवून घ्या आणि या पेस्टचा स्क्रब म्हणून उपाय करा. चेहऱ्यासकट संपूर्ण शरीरासाठी तुम्ही हे स्क्रब वापरू शकता.
डॉ. मंजिरी यांचा व्हिडिओ बघण्यासाठी आणि आणखी ब्यूटी टिप्स जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/reel/1014554759938024