Lokmat Sakhi >Beauty > फक्त २ चमचे मेथीचे दाणे केसांवर करतील काळी जादू, सुंदर केस पाहून सगळे विचारतील सिक्रेट

फक्त २ चमचे मेथीचे दाणे केसांवर करतील काळी जादू, सुंदर केस पाहून सगळे विचारतील सिक्रेट

Thick and Shinny Hair | Fenugreek Seeds For Healthier Hair : केसांवर वाट्टेल ते प्रयोग करु नका, पाहा हा नैसर्गिक घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 05:25 PM2024-11-11T17:25:15+5:302024-11-11T17:26:12+5:30

Thick and Shinny Hair | Fenugreek Seeds For Healthier Hair : केसांवर वाट्टेल ते प्रयोग करु नका, पाहा हा नैसर्गिक घरगुती उपाय

Thick and Shinny Hair | Fenugreek Seeds For Healthier Hair | फक्त २ चमचे मेथीचे दाणे केसांवर करतील काळी जादू, सुंदर केस पाहून सगळे विचारतील सिक्रेट

फक्त २ चमचे मेथीचे दाणे केसांवर करतील काळी जादू, सुंदर केस पाहून सगळे विचारतील सिक्रेट

आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीचा (Lifestyle) फटका कळत - नकळत संपूर्ण आरोग्यावर होतो (Health Tips). चुकीच्या खाण्याच्या पद्धती, खराब जीवनशैली आणि वाढत्या प्रदुषणामुळे केस खराब (Hair care Tips) होतात. केस गळतात, पांढरे होतात, यासह केस निर्जीव दिसू लागतात. केस सतत गळत असल्यास टक्कल पडण्याचीही भीती निर्माण होते. केस गळती वाढल्यावर आपण विविध लोकांचे ऐकून हेअर ऑईल किंवा शाम्पू बदलत राहतो. ज्यामुळे केस अधिक खराब होतात.

परंतु, आपण केस गळती नैसर्गिकरित्याही थांबवू शकता. यासाठी विशेष महागड्या तेलाची गरज नाही. केस गळती होऊ नये म्हणून आपण खोबरेल तेलाचा वापर करतो, पण फक्त खोबरेल तेलाचा वापर न करता, आपण मेथी दाण्यांचा वापर करून घरगुती तेल तयार करू शकता. मेथी दाण्यातील गुणधर्म केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. पण याचे तेल कसे तयार करावे? पाहा(Thick and Shinny Hair | Fenugreek Seeds For Healthier Hair).

मोड आलेल्या मेथी दाण्यांचे नैसर्गिक तेल

मोड आलेल्या मेथी दाण्यांचे तेल केसांसाठी फायदेशीर ठरते. मेथी दाण्यांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन - सी, प्रोटीन, हे स्कॅल्प हेल्दी ठेवण्यात मदत करते. याशिवाय मेथीच्या दाण्यात असणारे लोह हे रक्तप्रवाह चांगला करून केसांना मजबूत बनवतात. केसांच्या समस्या सोडवण्यासाठी मेथी दाणे फायदेशीर ठरते.

अँटी हेअर फॉल ऑइल कसे तयार करावे?

लागणारं साहित्य

मेथी दाणे

एलोवेरा जेल

वजन आणि बीपी चुकूनही वाढू न देणारे ६ चविष्ट पदार्थ, रोज नाश्त्याला खा पोटभर

कांदा

खोबरेल तेल

एरंडेल तेल

व्हिटॅमिन ई कॅप्सूल

या पद्धतीने तयार करा अँटी हेअर फॉल ऑइल

- सर्वात आधी, कोरफड घ्या. मधोमध चीर पाडून घ्या. कोरफडमध्ये २ चमचे मेथी दाणे पसरवा, आणि धाग्याने गुंडाळा. कोरफडीला धाग्याने बांधून दोन दिवस बाजूला ठेवा आणि दोन दिवसांनी मेथीला मोड फुटल्याचे दिसेल. आपण याच मेथी दाण्यांचा वापर करून अँटी हेअर फॉल ऑइल तयार करू शकता.

- नंतर मिक्सरचं भांडं घ्या. त्यात मोड आलेले मेथी दाणे, १ चिरलेला कांदा घालून पेस्ट तयार करा. आता गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवा आणि त्यात मेथी कांद्याची पेस्ट घाला.

डायबिटिस आहे म्हणून साखरेऐवजी गूळ खाताय? शुगरच नाही डोक्याचा ताप आणि खर्चही वाढेल कारण..

- पेस्ट घातल्यानंतर त्यात खोबरेल तेल घाला आणि 30-40 मिनिटे चांगले शिजवा. नंतर एका भांड्यात गाळून वेगळे करा. आता भांड्यात एरंडेल तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल तेल घाला आणि चांगले मिसळा. तयार तेल काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा. नंतर त्यात २ चमचे मेथी दाणे घाला. अशा प्रकारे केस लांब, मजबूत बनवणारे तेल रेडी.

- आंघोळीच्या १ तास आधी आपण केसांना तयार तेल लावून मसाज करू शकता. नंतर शाम्पूने केस धुवून घ्या. आठवड्यातून २-३ वेळा या तेलाचा वापर करू शकता.  

Web Title: Thick and Shinny Hair | Fenugreek Seeds For Healthier Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.