Lokmat Sakhi >Beauty > आंघोळीच्या ३० मिनिटं आधी केसांवर लावा 'एक' खास गोष्ट, केस होतील सिल्की घनदाट

आंघोळीच्या ३० मिनिटं आधी केसांवर लावा 'एक' खास गोष्ट, केस होतील सिल्की घनदाट

Things to do before washing your hair घाईघाईत केस धुऊ नका, केसांची निगा राखणं गरजेचं, त्यासाठीच हा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 11:27 AM2023-08-11T11:27:59+5:302023-08-11T12:27:00+5:30

Things to do before washing your hair घाईघाईत केस धुऊ नका, केसांची निगा राखणं गरजेचं, त्यासाठीच हा उपाय

Things to do before washing your hair | आंघोळीच्या ३० मिनिटं आधी केसांवर लावा 'एक' खास गोष्ट, केस होतील सिल्की घनदाट

आंघोळीच्या ३० मिनिटं आधी केसांवर लावा 'एक' खास गोष्ट, केस होतील सिल्की घनदाट

केसांमुळे आपल्या चेहऱ्याची शोभा वाढते. केस घनदाट, लांबसडक, काळेभोर, सिल्की कोणाला नको आहेत. पण प्रदूषित वातावरण, व बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. याव्यतिरिक्त महिलावर्ग आजकाल स्टायलिश दिसण्यासाठी केसांवर विविध उपाय करून पाहतात. या सर्व गोष्टींच्या अतिवापरामुळे केसांचे मोठे नुकसान होते.

केसांची निगा राखण्यासाठी नियमित तेल लावणे, आहारात बदल, यासह नैसर्गिक उपायांचा वापर करणे आवश्यक आहे. प्रदूषित वातावरणामुळे केस लवकर खराब होतात. जर केसांची योग्य काळजी घ्यायची असेल, तर आंघोळीपूर्वी केसंवार या २ गोष्टी लावायला विसरू नका. यामुळे केस घनदाट, मुलायम आणि सिल्की होतील(Things to do before washing your hair).

खोबरेल तेल

केस मजबूत आणि घनदाट हवे असतील तर, आपल्या आईपासून ते आजीपर्यंत सगळ्यांनीच खोबरेल तेल लावण्याचा सल्ला दिला असेल. कारण केसांच्या पोषणासाठी तेल लावणे महत्त्वाचे आहे. आंघोळीच्या ३० मिनिटापूर्वी किंवा रात्री केसांवर खोबरेल तेल लावा. यासाठी एका वाटीत कोमट खोबरेल तेल घ्या. हलक्या हाताने केसांवर आणि स्काल्पवर तेल लावा. बोटांनी १० मिनिटे स्काल्पवर मसाज करा. त्यानंतर केस धुवा.

कापूर-कडूनिंब- लिंबू आणि दही, केसांत कोंड्याचे थर असतील तर करा ३ उपाय

केसांना खोबरेल तेल लावण्याचे फायदे

खोबरेल तेल फॅटी ऍसिड आणि जीवनसत्त्वांनी भरलेले असते. ज्यामुळे केसांची वाढ जलद होते. शुद्ध खोबरेल तेलाचे अनेक फायदे आहेत, त्यामुळेच केसात कोंडा, टाळूला खाज सुटणे, केस गळणे, केस अकाली पांढरे होणे यासारख्या सामान्य समस्या कमी होतात.

दही

स्काल्प आणी केसांमधील कोरडेपणा कमी करण्यासाठी दह्याचा वापर होतो. केसांवर दह्याचा वापर केल्याने केस मुलायम, सिल्की आणि शाईन करतात. त्यामुळे आंघोळीच्या ३० मिनिटापूर्वी केसांवर दही लावा. यासाठी केसांच्या लांबीनुसार एका वाटीत दही घ्या. दही चांगले फेटून घेतले तरी चालेल. व हे दही केसांवर लावा. ३० मिनिटानंतर केस धुवा.

१ चमचा मेथीचे दाणे आणि ३ उपाय -केसातला कोंडा-पांढरे केस-समस्या गायब

केसांना दही लावण्याचे फायदे

दह्याचा हेअर मास्क केसांवर लावल्याने, केस आतून फ्लेक्सिबल होतात. ज्यामुळे केस सिल्की दिसतात. दह्यामधील पोषणामुळे केस लहान वयात पांढरे होत नाही. मेथीचे दाणे दह्यात बारीक करून केसांना लावल्यास केस गळणे, केसांना कोंडा होणे, केस कोरडे होणे या समस्या सहज कमी होतात. 

Web Title: Things to do before washing your hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.