Join us  

दिवाळीत हेवी मेकअप करताय पण मेकअप नीट काढला नाही तर?  मेकअप काढण्याच्या ५ पद्धती, त्वचा सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2022 3:27 PM

Makeup Remover Diwali Heavy Makeup निरोगी त्वचेसाठी मेकअप योग्य प्रकारे काढणे आवश्यक आहे, ५ सोप्या पद्धतीने काढा मेकअप 

दिवाळी या सणानिमित्त महिलावर्ग नटण्यात व्यग्र असतात. पोशाक, हेअरस्टाईल, मेकअप ट्रेण्डनुसार बदलत राहते. आणि त्या ट्रेण्डनुसार महिला आपल्या लुकमध्ये बदल आणत असतात. या ५ दिवसांच्या सणानिमित्त महिलावर्ग मेकअपचा अधिक वापर करतात. मेकअप जर वेळेवर काढलं नाही तर, कोमल त्वचेवर स्किनच्या निगडित अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे मेकअप हा योग्यरीत्या चेहऱ्यावरून निघाला पाहिजे आणि यासह डबल क्लींजिंग देखील झाली पाहिजे. यासाठी आज आपण पाच असे टिप्स जाणून घेणार आहोत ज्याद्वारे मेकअप सहज काढता येईल. आणि त्वचा मुलायम राहिल.

बेबी ऑइल अथवा क्लींजिंग ऑइल

क्लींजिंग ऑइलमध्ये सर्फेस एक्टिव एजेंट्स आहेत, जे तेलावर आधारित मेकअप आणि सनस्क्रीनचा जाड थर सहजपणे काढू शकतात. हे मेकअप काढताना त्वचेला हायड्रेट करते. जर क्लींजिंग ऑइल नसेल तर त्याव्यतिरिक्त तुम्ही बेबी ऑइल देखील वापरू शकता. कापसाच्या पॅडमध्ये बेबी ऑइल घ्या आणि हळूवारपणे चेहरा स्वच्छ करा. आणि धुवून टाका.

क्लींजिंग बाम

क्लींजिंग बाम हे एक मल्टीपर्पज स्किनकेयर प्रोडक्ट आहे जे चेहऱ्यावरून मेकअप काढण्यास मदत करते आणि त्वचेला मॉइश्चरायझ करते. सर्वप्रथम बाम आधी आपल्या बोटांवर घेऊन चोळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सर्कुलर मोशननुसार चेहऱ्यावर हलक्या हाताने मेकअप लावल्याल्या ठिकाणी पसरवायचे आहे. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणाही दूर होतो. त्यानंतर चेहरा फेसवॉशने धुवून टाकायचे.

कोल्ड क्रीम

जर तुमच्याकडे मेकअप काढण्याचे उत्पादन नसेल, तर कोल्ड क्रीमचा वापर करा. कोल्ड क्रीम त्वचेत विरघळते आणि चेहरा मॉइश्चरायझ करते यासह मेकअप देखील काढून टाकते. कोल्ड क्रीम चेहऱ्यावर लावावे आणि त्यानंतर टिश्यू किंवा कॉटन पॅडने स्वच्छ करावे.

मेकअप रिमूव्हल वाईप्स

बाजारात खास मेकअप रिमूव्हल वाईप्स मिळतात, ते फक्त सिंगल यूज असतात आणि ते ऑइल बेस आणि वॉटरप्रूफ मेकअपसाठी उत्तम पर्याय आहेत. या वाईप्समध्ये मिसेलर वॉटर, एलोवेरा आणि दूसरे नेचुरल ऑइल मिसळले असतात. जे चेहऱ्यासाठी उत्तम आहे. मात्र, खरेदी करताना अल्कोहोल फ्री वाईप्स खरेदी करा. कारण, अल्कोहोल फ्री वाईप्सचा वापर केल्याने चेहरा कोरडा पडत नाही.

मिसेलर पाणी

मिसेलर पाणी खरंतर पाण्यासारखेच दिसते मात्र, त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. त्यात असलेले घटक त्वचेतील तेल आणि घाण काढून टाकते. अशा प्रकारे तुम्ही तुमची त्वचा टोन करू शकता आणि मेकअप काढू शकता. हे पाणी मेकअप सहजपणे काढून टाकते.

टॅग्स :मेकअप टिप्सब्यूटी टिप्स