Dark Elbows Home Remedies : हाताच्या कोपरांचा ही एक चिंताजनक समस्या आहे. कोपरांचा रंग काळा झाला तर अनेक महिलांना स्लीव्हजलेस ड्रेस घालता येत नाही. किंवा लांब बाह्यांचेच कपडे वापरणं भाग असतं. अनेक केमिकल्स, क्रीमचा उपाय करूनही काळपटपणा दूर होत नाही. अशात ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती गोष्टींची मदत घेऊ शकता.
बटाट्याचा रस
बटाट्याचा रस कोपरांचा काळपटपणा कमी करण्यासाठी वापरू शकता. बटाट्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे त्वचेवरील डेड स्कीन दूर करतं. यासाठी बटाट्याचा रस १५ ते २० मिनिटांसाठी लावून ठेवा, नंतर पाण्यानं धुवून घ्या.
हळद आणि दही
हळद आणि दह्याचं मिश्रणकाळपटपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं तत्व असतं जे त्वचेवरील डेड स्कीन दूर करतं. तर दह्यातील लॅक्टिक अॅसिडमुळे त्वचा चमकदार होते. यासाठी दह्यात हळद मिक्स करून १५ ते २० मिनिटं कोपरांवर लावून ठेवा. नंतर पाण्यानं धुवून घ्या.
लिंबू आणि साखर
लिंबू आणि साखरेचं मिश्रण देखील कोपरांचा काळपटपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे त्वचेवरील डेड स्कीन दूर करतं. तर साखरेमध्ये एक्सफोलिएटिंग गुण असतात. ज्यानं त्वचा चमकदार होते. यासाठी या दोन्ही गोष्टीचं मिश्रण १५ ते २० मिनिटं लावू ठेवा. नंतर पाण्यानं धुवून घ्या.
बेसन आणि दही
कोपरांचा काळपटपणा दूर करण्यासाठी बेसन आणि दह्याचं मिश्रणही फायदेशीर ठरतं. बेसनांमध्ये एक्सफोलिएटिंग गुण असतात, जे त्वचेवरील डेड स्कीन दूर करतात. तर दह्यातील लॅक्टिक अॅसिडनं त्वचा चमकदार होते.
तांदळाचं पीठ
तांदळाचं पीठ देखील कोपरांचा काळेपणा दूर करतं. यात एक्सफोलिएटिंग गुण असतात, जे त्वचेवरील डेड स्कीन दूर करतात. तांदळाचं पीठ पाण्यात मिक्स करून लावा. १५ ते २० मिनिटांनी धुवून घ्या.