Wrinkles Home Remedies : त्वचेची योग्य ती काळजी न घेणं, पोषणाची कमतरता, खराब लाइफस्टाईल, तणाव आणि झोपेची कमतरता यामुळे कमी वयातच लोकांमध्ये म्हातारपणाची लक्षणं दिसू लागतात. कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. अशात चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. मग बरेचजण या सुरकुत्या घालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रोडक्ट्चा वापर करतात. पण त्यांचेही काही साइड इफेक्ट्स असतात. अशात काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. असाच एक घरगुती सोपा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी किचनमधील एक मसाला खूप फायदेशीर ठरतो आणि तो मसाला म्हणजे जायफळ. जायफळाचा वापर तुम्ही अनेक पदार्थांमध्ये केला. पण याचे त्वचेला होणारे फायदे तुम्हाला माहीत नसतील. जायफळांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. ज्यामुळे कोलेजन प्रोडक्शन वाढतं. यानं त्वचा टाइट होते आणि सुरकुत्या कमी होतात.
कसा कराल वापर?
जायफळ त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. पण अनेकांना हे माहीत नसतं. याचा वापर करून त्वचेवर कमी वयातच दिसणारी म्हातारपणाची लक्षणं कमी केली जाऊ शकतात. त्वचेवरील सुरकुत्या तर दूर होतीलच, सोबतच काळे डागही दूर होतील. जायफळानं स्किन सेल्सची वाढ चांगली होते, ज्यामुळे त्वचा टाइट होण्यास मदत मिळते. याचा वापर सुरकुत्या, फाइन लाइन्स आणि सॅगी स्कीनची समस्याही दूर होते.
जायफळाचं सेवन करण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ रात्रीची असते. रात्री एक ग्लास कोमट दुधात चिमुटभर जायफळाचं पावडर टाकून पिऊ शकता. यानं तुम्हाला चांगली झोप येईल, सोबतच आरोग्यही चांगलं राहील.
फेसपॅक बनवा
स्कीन टाइट करण्यासाठी आणि चमकदार करण्यासाठी जायफळाचा फेसपॅकही बनवू शकता. यासाठी जायफळाच्या पावडरमध्ये गुलाबजल, कोरफड, दही आणि मध मिक्स करून फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर अर्धा तास लावून ठेवा आणि पाण्यानं धुवून घ्या. तुम्ही जायफळाच्या पावडरमध्ये मध मिक्स करूनही लावू शकता. यानं चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत मिळेल.