Join us  

चमचाभर गव्हाच्या पिठाची पाहा जादू; टॅनिंग-सुरकुत्या होतील दूर; चेहरा दिसेल इतका टवटवीत की...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2024 2:54 PM

This Wheat Atta face pack can lighten your tanned skin : कोण म्हणतं गव्हाच्या पिठाच्या फक्त पोळ्याच होतात? एकदा फेस पॅक करून पाहा; सुंदर त्वचेचं सिक्रेट..

भारतीय घरांमध्ये रोजच्या वापरात येणारे पीठ म्हणजे 'गव्हाचं पीठ'. चपाती असो किंवा इतर पदार्थ. स्वयंपाक करताना आपण गव्हाच्या पिठाचा वापर करतोच. फक्त पोळ्या करण्यासाठी आपण जर गव्हाच्या पिठाचा वापर करत असाल तर, थांबा. याचे इतरही वापर पाहा. आपण कधी गव्हाच्या पिठाचा (Wheat Flour Face Pack) वापर चेहऱ्यासाठी करून पाहिलं आहे का? आता तुम्ही म्हणाल गव्हाच्या पीठाचा वापर तेही चेहऱ्यासाठी?

तर हो, आपण याच्या वापराने चेहऱ्याचे अनेक समस्या सोडवू शकता. गव्हाच्या पिठाचा फेसमास्क लावल्याने सनबर्न, टॅनिंग, वृद्धत्वाचे निशाण, सुरकुत्या, मुरुमांचे डाग यासह उन्हाळ्यातील त्वचेच्या इतर समस्यांपासून रक्षण करते (Skin Care Tips). पण गव्हाच्या पिठाचा फेस पॅकचा वापर कसा करावा? कसा तयार करावा? पाहूयात(This Wheat Atta face pack can lighten your tanned skin).

गव्हाच्या पिठाचा फेस पॅक करण्यासाठी लागणारं साहित्य

गव्हाचं पीठ

एलोवेरा जेल

चंदन पावडर

लिंबाचा रस/दही

वजन कमी करायचं आहे? मग गव्हाच्या पोळ्याऐवजी खा 'या' पिठाच्या चपात्या; वेट लॉससाठी उत्तम

मॅश केलेली केळी

गुलाबजल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, मॅश केलेली केळी आणि गुलाबजल घालून मिक्स करा. नंतर त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस, चंदन पावडर आणि एलोवेरा जेल घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. आता चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तयार फेस पॅक चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आपण या फेस पॅकचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. चेहऱ्यावरचे फेस पॅक धुवून काढल्यानंतर टोनर लावा. यामुळे फेस पॅकमधील घटक चेहरा शोषून घेईल. ज्यामुळे चेहरा टवटवीत दिसेल.

चेहऱ्यावर गव्हाचे पीठ लावण्याचे फायदे

शिदोरीत बांधून दिलेली गावरान कांद्याची चटणी, चमचमीत इतकी की मळ्यातल्या जेवणाची येईल आठवण..

गव्हाच्या पिठात व्हिटॅमिन ए आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असते. याशिवाय या पीठात कार्ब्स आणि फायबर देखील आढळते. याच्या वापराने आपण उन्हाळ्यातील त्वचेच्या निगडीत अनेक समस्या सोडवू शकता. शिवाय तेलकट त्वचा, सुरकुत्या, टॅनिंग, मुरुमांचे डाग, यासह त्वचेला मॉइश्चराइझ देखील करू शकता. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशल