कोरोना आला आणि त्याच्या धास्तीपायी प्रत्येकीचे पार्लरमध्ये जाणे जरा कमीच झाले. तरूणींचे कॉलेज आणि बऱ्याच नोकरदार महिलांचे ऑफिस घरीच आले. अनेक सणसमारंभांचे सेलिब्रेशनही थांबले. त्यामुळे मग ब्युटी ट्रिटमेंट्स करून घेणे, एवढे काही अत्यावश्यक राहिले नाही. पण जर कधी कुठे जाण्याची वेळ आलीच किंवा वॅक्स न केलेले आपले हात- पाय पाहणे आपल्यालाच नकोसे झाले, तर मात्र पार्लरवाचून आपले काही अडायला नको. म्हणूनच तर आपले आपल्याला घरीच वॅक्स करता येण्यासाठीच तर आहे टिकटॉक वॅक्स.
टिकटॉक वॅक्स करण्याचे फायदे१. या वॅक्ससाठी कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत. त्यामुळे वॅक्स करण्याची ही एक नैसर्गिक पद्धत आहे.२. संवेदनशील त्वचेसाठी हे वॅक्स फायदेशीर मानले जाते.३. या वॅक्समुळे फार वेदना होत नाहीत आणि त्वचेवर रॅशेस, पुरळं देखील येत नाही.४. टिक- टॉक वॅक्स केल्यामुळे केसांची वाढ कमी होते.
टिकटॉक वॅक्स बनविण्यासाठी लागणारे साहित्यएक कप साखरपाव कप लिंबाचा रसपाव कप पाणी
कसे बनवायचे टिकटॉक वॅक्स१. टिकटॉक वॅक्स बनविण्यासाठी सगळ्यात आधी नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवा आणि या पॅनमध्ये साखर, लिंबाचा रस, पाणी असे सगळेच साहित्य टाका. २. हे मिश्रण वितळेपर्यंत गॅस मोठा ठेवावा.
३. एकदा मिश्रण वितळणे सुरू झाले की मग गॅसची आच कमी करा आणि हे मिश्रण चमच्याने वारंवार हलवत रहा.४. मिश्रण पिवळसर रंगाचे झाले आहे, असे लक्षात येताच गॅस बंद करावा.५. यानंतर १० मिनिटांत हे मिश्रण वापरायला घ्या.६. हे मिश्रण अगदी कोमट झाले तर त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे अंगाला चटके बसणार नाहीत पण मिश्रण गरम असेल, अशा वेळी ते वापरण्यास घ्यावे. ७. वॅक्स फार घट्ट झाले तर पुन्हा गॅसवर ठेवावे आणि जरा पातळ करून घ्यावे.
कसे वापरायचे टिकटॉक वॅक्स१. हे वॅक्स गरम असतानाच वापरायचे आहे, हे सगळ्यात आधी लक्षात ठेवा. पण गरम असले तरी ते तुम्हाला सहन होईल, चटके बसणार नाहीत, असेच असावे.२. वॅक्स करण्याआधी त्वचा व्यवस्थित स्वच्छ करून कोरडी करून घ्या.३. यानंतर त्वचेवर कोणतेही टाल्कम पावडर लावा. जेणेकरून त्वचेवर कोणताही ओलावा आणि तेलकटपणा राहणार नाही.४. यानंतर तुमच्या त्वचेवरच्या केसांची वाढ ज्या दिशेने आहे, त्याच दिशेने त्वचेवर बटर नाईफच्या मदतीने वॅक्स लावून घ्या.५. यानंतर लगेचच वॅक्सच्या स्ट्रिप घेऊन केसांची वाढ ज्या दिशेने आहे, त्याच्या उलट दिशेने स्ट्रिप ओढण्यास सुरूवात करा. ६. सराव होण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण एकदा सराव झाला की, घरच्याघरीच अगदी झटपट वॅक्स करता येते.
वॅक्स करताना ही काळजी घ्या.- वॅक्स करताना वॅक्सिंग स्ट्रिप सारख्या उलटसुलट दिशेने ओढू नका. यामुळे त्रास होऊ शकतो.- वॅक्स खूप गरम नसून चटका बसणार नाही, याची काळजी घ्या.- वॅक्स झाल्यावर त्वचा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यावर बर्फ लावा आणि त्यानंतर मॉईश्चरायझर लावण्यास विसरू नका.