स्वतःच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी तसेच सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक महिला पायांच्या बोटांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत सगळ्या अवयवांची काळजी घेत असतात. आपण सुंदर दिसावं यासाठी त्या दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्स घेत असतात. सौंदर्य म्हटलं की महिला फक्त आपल्या चेहेऱ्याचाच विचार न करता सर्वांगाचा विचार करतात. चेहेऱ्यासोबत त्या हात - पाय यांचीदेखील तितकीच काळजी घेतात. हातापायांचे वेळच्या वेळी मेनिक्युअर, पेडीक्युअर करणे, त्यांची काळजी घेणे, नेलपेंट लावून त्यांची सुंदरता अधिक वाढवणे अशा सगळ्या गोष्टी केल्या जातात.
काही महिलांना हातांना वेगवेगळ्या रंगाची नेलपेंट लावायला आवडते. काहीवेळा तर या महिला स्वतःच्या आवडीच्या अनेक नेलपेंट घेतात मग आपल्या आवडीनुसार त्या लावतात. अशा बऱ्याच नेलपेंट एकाच वेळी खरेदी करून ठेवल्यास त्या काही कालांतराने सुकून खराब होतात. एकाच वेळी खरेदी केलेल्या या नेलपेंट्स व्यवस्थित स्टोअर केल्या नाहीत तर त्या सुकल्यावर फेकून द्याव्या लागतात. अशावेळी महागड्या ब्रँडसच्या विकत घेतलेल्या नेलपेंट्स फेकून दिल्याने फारच नुकसान होते. अशा परिस्थितीत, काही सोप्या टिप्स वापरुन या महागड्या ब्रँड्सच्या नेलपेंट्स सुकून खराब होण्यापासून वाचावू शकतो(Tips and tricks 4 hacks for reusing old dry nail paint again).
नेलपेंट्स सुकू नये यासाठी नेमके काय करावे ?
१. फ्रिजमध्ये स्टोअर करणे टाळावे :- काही महिला नेलपेंट्स विकत आणल्यानंतर त्या टिकवून ठेवण्यासाठी फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतात. परंतु हे चुकीचे आहे. नेलपेंट्स फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवल्याने गारव्याने त्या थंड पढून गोठण्यास सुरुवात होते. नेलपेंट्सच्या जाड गुठळ्या तयार होतात, त्यामुळे अशा गुठळ्या तयार झालेल्या नेलपेंट्सनखांवर लावणे कठीण होऊन बसते. त्यामुळे नेलपेंट्स फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवण्यापेक्षा बाहेर सामान्य तापमानात स्टोअर करून ठेवण्यास त्या दीर्घकाळ चांगल्या टिकून राहतात.
एक रुपयाही खर्च न करता ८ गोष्टी करा, कोरियन तरुणींसारखा चमकदार आणि सुंदर दिसेल चेहरा...
२. गरम पाण्याचा वापर करावा :- जर बराच काळ स्टोअर करून नेलपेंट आतून सुकली असेल तर नेलपेंटची बॉटल गरम पाण्यात ठेवावी. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात नेलपेंटची बॉटल १५ ते २० मिनिटांसाठी तशीच राहू द्यावी. असे केल्याने, आतून घट्ट झालेली नेलपेंट पुन्हा द्रव रुपात येऊन सैल होऊ लागेल आणि अशा प्रकारे आपण ती नेलपेंट पुन्हा वापरू शकता. गरम पाण्यातून नेलपेंटची बॉटल काढल्यानंतर ती चांगली मिसळून घ्यावी आणि नंतरच नखांवर लावावी.
३. नेलपेंट थिनरचा वापर :- नेलपेंट थिनर बाजारात सहज उपलब्ध होते. याचा वापर करून देखील आपण नेलपेंट सैल करू शकता. चांगल्या दर्जाचे नेलपॉलिश थिनर खरेदी करा. त्याचे दोन ते तीन थेंब नेल पेंटच्या बाटलीत घालून बॉटल चांगली हलवा. असे केल्याने नेलपेंट सैल होते. जर आपण यासाठी नेलपॉलिश रिमूव्हर वापरत असाल तर हे अजिबात करू नका, कारण यामुळे नेलपेंट लिक्विडमध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात.
४. उन्हांत ठेवा :- नेलपॉलिश घट्ट होत असेल तर थोडावेळ उन्हात ठेवा. यानंतर ते नखांवर लावण्यापूर्वी चांगले मिसळा. सूर्यप्रकाशात ठेवल्यास द्रव वितळतो. त्यामुळे उन्हात वितळून नेलपेंट पातळ होते. त्यामुळे नवीन नेलपॉलिश विकत घेण्याची किंवा जुने नेलपेंट फेकून देण्याची गरज भासणार नाही.
हातापायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरा प्युमिक स्टोनची जादू... हातापायांचे सौंदर्य येईल खुलून...
चेहरा टॅनिंगमुळे डल दिसतोय? रात्रभरात टॅनिंग घालवतील ५ फेसपॅक, दिसेल नितळ त्वचा...
नेलपेंट स्टोअर करताना कोणती काळजी घ्यावी...
१. थेट पंख्याखाली बसून नेलपॉलिश कधीही लावू नका. नेल पेंट लावण्यापूर्वी पंखा बंद करा.
२. ब्रशला नेल पेंट लावताच झाकण हलके बंद करा, नेलपॉलिशची बाटली पूर्णपणे उघडी ठेवू नका.
३. नेलपेंट फ्रिजमध्ये न ठेवता सामान्य तपमानावर बॉक्समध्ये ठेवा, अन्यथा नेलपॉलिशच्या द्रवामध्ये गुठळ्या तयार होतील.
४. जर नेलपेंट बराच काळ न वापरात नसेल ते तसेच ठेवले असेल, तर वापरण्यापूर्वी ते चांगले रोल करून हलवून घ्यावे.