वाढत्या वयामुळे लोकांना केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते (Hair Care Tips). यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीवरही परिणाम होतो. पांढरे केस काळे करण्यासाठी लोक केमिकल्सयुक्त डायचा वापर करतात. पण याचा त्वरीत परिणाम दिसतो असं नाही. दीर्घकाळ केस गळती यामुळे उद्भवू शकते. एक सोपा उपाय करून तुम्ही केसांना काळे आणि दाट बनवू शकता. ज्यामुळे केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही. (Tips And Tricks Ayurvedic Doctor Black Hairs Trick And Tips With Tea Leaves Home Kitchen Try Method)
आयुर्वेदीक तज्ज्ञ डॉ. बालकृष्ण सांगतात की, काही घरगुती साहित्य जसं की आवळा, मुलेठी, चहा पावडर, कॉफी आणि कढीपत्ता केसांना काळे करण्यासाठी तुमची मदत करू शकतो. या सर्व साहित्यात नैसर्गिक तत्व असतात जे फक्त केसांना काळे करत नाही तर केसांना मजबूत आणि निरोगी ठेवतात. चहा पावडरमधील टॅनिन नावाचे तत्व केसांना रंग देण्यास फायदेशीर ठरतं. हे मिश्रण पूर्णपणे केमिकल्स विरहीत असते ज्यामुळे ते जास्त सुरक्षित असते.
१ वाटी रव्याचे करा १० मिनिटांत गोल-गोल फुललेले अप्पे; झटपट करा पौष्टिक नाश्ता
आयुर्वेदीक विशेषज्ञ डॉ. बाळकृष्ण सांगतात की, सगळ्यात आधी तीन कप पाण्यात ३ मोठे चमचे चहा पावडर घाला आणि मंद आचेवर उकळवून घ्या. जेव्हा पाणी अर्ध राहील तेव्हा गाळून थंड करून घ्या. नंतर त्यात ५० ग्रॅम आवळा पावडर, २५ ग्रॅम मुलेठी पावडर आणि १० ग्राम कढीपत्ता, कॉफी पावडर व्यवस्थित मिसळून घ्या. हे मिश्रण एका लोखंडाच्या भांड्यात रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण केसांना व्यवस्थित लावा. ३ ते ४ तास सुकवण्यासाठी सोडा, शेवटी साध्या पाण्यानं केस धुवा.
चहापावडर, आवळा मुलेठी आणि कढीपत्ता हे मिश्रण केसांना नैसर्गिकरित्या काळे करते. यात कोणतेही केमिकल्स नसतात ज्यामुळे केसांचे नुकसान होते. हे मिश्रण केसांच्या मुळांना मजबूत करते. ज्यामुळे केस गळणं कमी होते. चहा पावडरमधली एंटी ऑक्सिडेंट्स केसांना केवळ चमकदार बनवत नाही तर निरोगी राहते. केमिकल्स विरहित डाय केसांना दीर्घकाळ दाट, मजबूत ठेवण्यास मदत करते. हे घरगुती उपाय प्रभावी ठरतात. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी हा चांगला उपाय आहे.
केमिकल्सयुक्त हेअर डायमुळे होणारं नुकसान
आयुर्वेदीक डॉ. बालकृष्ण सांगतात की केमिकल्सयुक्त हेअर डाय लावल्यानं एलर्जी, ड्रायनेस, खाज, चट्टे पडतात. सतत केमिकल्सयुक्त हेअर डाय लावल्यानं ठराविक वेळेनंतर केस पुन्हा पांढरे होऊ शकतात.