Join us  

फेशियलचा ग्लो गायब-चेहरा काळवंडला? मुलतानी मातीचा १ खास उपाय; चेहऱ्यावर येईल तेज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 11:15 PM

Tips And Tricks : एक्ने आणि  पिंपल्स दूर करण्यासाठी हा फेसपॅक तुम्ही लावू शकता. हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यानं चेहरा डागविरहीत दिसेल.

मुलतानी माती (Multani Mati) एक असा घटक आहे ज्याचा स्किन केअर रूटीनमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. चेहरा सुंदर दिसण्यासाठी आणि चेहऱ्यावर डाग नको असतील तर तुम्ही मुलतानी मातीचा चेहऱ्याचा वापर करू शकता. पुरातन काळापासून मुलतानीचा वापर चेहऱ्यावर केला जात आहे. मुलतानी माती स्किनवर जास्त प्रमाणात तेल येण्यास रोखते आणि स्किन एक्सफोलिएट करण्यास उपयोग होतो. त्वचेवरील हलके डाग निघून जाण्यास मदत होते. त्वचेवर ग्लो येण्यासाठी मुलतानी माती तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. (Tips And Tricks How To Improve Handwriting In 10 days These Pen Exercise For 2 Minutes Every Day)

1) मुल्तानी माती आणि दूध

दुधात मुल्तानी माती मिसळून फेस पॅक तयार करणं खूपच सोपं आहे. हा फेस पॅक लावल्यानं त्वचेवर उजळपणा येतो. एक चमचा मुल्तानी मातीत गरजेनुसार दूध मिसळा. हा फेस पॅक चेहऱ्याला १० मिनिटं लावून ठेवा नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. त्वचा चमकू लागेल.

चष्मा लावल्याने नाकावर काळे डाग पडले? ८ उपाय-डाग गायब होतील काहीच दिवसांत...

2) मुलतानी माती आणि मध

हा फेस पॅक बनवणं खूपच सोपं आहे.  एक चमचा मुल्तानी मातीत एक चमचा मध आणि थोडंसं दूध मिसळा. चेहऱ्याला १५ मिनिटं लावून ठेवा. हा फेस पॅक चेहऱ्यावर  १५ मिनिटांसाठी लावून ठेवा.  हा फेस पॅक आठवड्यातून एकदा चेहऱ्याला लावल्यासही चेहऱ्यावर कमालीचा ग्लो दिसून येईल.

3) मुल्तानी माती आणि पपईचा रस

चेहऱ्यावर धूळ घाण  आणि डेड सेल्स जमा झाल्यास तुम्ही हा फेस पॅक लावू शकता.  एक चमचा पपईच्या गरात एक चमचा मुल्तानी माती आणि एक चमचा मध मिसळा. फेस पॅक खूपच घट्ट असतो. यात गरजेनुसार पाणी आणि गुलाबपाणी मिसळा. चेहऱ्यावर १५ मिनिटं लावून ठेवा.  नंतर चेहरा स्वच्छ धुवा.

केस खूप तुटतात-टक्कल दिसतंय? जास्वंदाच्या फुलांत हा पदार्थ घालून बनवा हेअर मास्क, झुपकेदार-दाट होतील केस

4) मुल्तानी आणि लिंबाचा रस

एक्ने आणि  पिंपल्स दूर करण्यासाठी हा फेस पॅक तुम्ही लावू शकता. हा फेस पॅक चेहऱ्याला लावल्यानं चेहरा डागविरहीत दिसेल. हा फेस पॅक बनवण्यासाठी २ चमचे मुल्तानी मातीत १ चमचा लिंबाचा रस मिसळा. पाण्यासोबत ही पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा  १५ ते २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या ज्यामुळे  चेहऱ्यावर चमक येईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी