Join us  

हात-पायांवर टॅनिंग, चेहराही काळवंडलाय? १५ मिनिटांत टॅनिंग निघेल, करा खास घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 12:13 PM

Tips for getting the best sun tan safely : याचा वापर केल्यास तुम्हाला संपूर्ण शरीरावरचं टॅनिंग अगदी सहज काढून टाकण्यास मदत होईल.

पावसाळा असो किंवा उन्हाळा त्वचेवर घाम जमा झाल्याने, पाण्यात बदल झाल्याने त्वचेवर टॅनिंग येतं. टॅनिंगमुळे त्वचा काळपट दिसू लागते. अशा स्थितीत टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही डि टॅक पॅकचा वापर करू शकता. (Tips for getting the best sun tan safely) हा पॅक घरी बनवणं खूपच सोपं आहे. याचा वापर केल्यास तुम्हाला संपूर्ण शरीरावरचं टॅनिंग अगदी सहज काढून टाकण्यास मदत होईल. चेहरा, मान गळ्याशिवाय हातापायांनाही तुम्ही हे लावू शकता. (Tanning will be removed in 15 minutes easy home remedies)

टॅनिंग हटवण्यासाठी डि-टॅन पॅक

हा पॅक बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीत एक चमचा कॉफी पावडर घ्या. त्यात एक चमचा मध मिसळा.  बटाट्याचा रस घाला आणि एक चमचा भरून बटाट्याचा रस त्यात घाला.  ता त्यात एक चमचा चंदन पावडर मिसळा तयार आहे डी टॅन पॅक, हा पॅक लावून तुम्ही उन्हामुळे झालेलं टॅनिंग सहज काढू शकता.

हा डी टॅन पॅक १५ मिनिटांसाठी त्वचेवर लावून ठेवा नंतर ओल्या कापडानं स्वच्छ करा. नंतर पाण्यानं धुवा. यामुळे टॅन झालेल्या त्वचेवर चमक दिसू लागेल. याशिवाय त्वचा स्वच्छ दिसेल. हा डी टॅन पॅक तुम्हाला आठवड्यातून २ ते ३ वेळा लावावा लागेल.  यामुळे पूर्ण टॅनिंग निघून जाण्यास मदत होईल.

१)टॅनिंग काढून टाकण्यासाठी टोमॅटोचा  (Tomato Juice) रससुद्धा तुम्ही लावू शकता. टोमॅटोच्या रसानं टॅनिंग कमी होतं. 

२) बटाट्याच्या रसात लिंबू मिसळून लावल्यानं टॅनिंग असलेली त्वचा क्लिन दिसू लागते.

३) कॉफी आणि मध मिसळून त्वचेवर लावल्यानं टॅनिंगपासून सुटका मिळते. त्वचेवर एलोवेरा मिसळून लावल्यान टॅनिंगची समस्या दूर होते. यामुळे सनबर्नसुद्धा रोखता येते आणि त्वचा ग्लो करते.

नाईट क्रिम न विसरता लावा

रात्री झोपण्याआधी हातांना आणि पायांना क्रिम लावायला हवी. अशी क्रिम  ज्यात AHA बरोबरच स्किन लाईटनिंग इंग्रेडिएंट्स असतात. जसं की व्हिटामीन सी, लिकोराईस, अफ्ला-अर्बुटिन आणि कोजिक एसिड, यामुळे पिग्मेंटेशन रोखता येतं आणि डल झालेली त्वचा ग्लो करते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी