(Image Credit- Pinterest)
सौंदर्याचा विचार केला जातो तेव्हा सर्वात महत्वाची भूमिका बजावतो त्वचेचा पोत. आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी भरपूर पैसे खर्च करतात. मेकअपचे थर लावतात. क्रीम्स आणि सौंदर्य उपचारांवर खर्च केला जातो. मात्र त्वचेचा पोत चांगला नसेल, त्वचा हेल्दी नसेल तर हे सगळे वरवरचे उपाय व्यर्थ आहेत. जोपर्यंत आहाराच्या सवयी बदलल्या जात नाहीत, तोपर्यंत नितळ, हेल्दी त्वचेचे स्वप्न साकार होणे कठीण आहे. (Skin Care Tips) न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी या संदर्भात एक पोस्ट केली आहे. (Tips For Glowing Skin Naturally) ग्लोइंग स्किनसाठी काय खावे आणि काय नाही हे त्या सांगतात. फार अवघड गोष्टी नाहीत त्यामुळे आपल्या दिनक्रमात काही मिनिटं जरी दिली तरी हे उपाय करणं शक्य आहे. (Nutritionist anjali mukerjee shared time tested diet tips for glowing skin)
अंजली सांगतात, 'आपल्या त्वचेमध्ये स्वतःला पुन्हा टवटवीत करण्याची शक्ती आहे. वाढत्या वयात त्वचेवर सुरकुत्या आणि डाग दिसू लागतात. दिसण्याबरोबरच त्वचेचा पोतही बदलू लागतो. कालांतराने, त्वचेची स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमता देखील कमी होऊ लागते. म्हणूनच आपण दररोज आपल्या त्वचेची थोडी अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.’
भाज्यांचे सूप
अंजली मुखर्जी यांनी रोज एक ग्लास भाज्यांचा रस पिण्याचा सल्ला देतात. गाजर, टोमॅटो आणि बीटचा रस त्वचा आणि यकृतातील विषारी पदार्थ साफ करतो. वनस्पती-आधारित आहार शरीराला व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई आणि सेलेनियम प्रदान करतो, जे वृद्धत्व कमी करते तसेच नवीन पेशींना चालना देतात.
या गोष्टी टाळा
धुम्रपान करत असाल तर ते सोडणं उत्तम. त्यामुळे त्वचेचे खूप नुकसान होते.
यासोबतच तळलेले आणि जास्त तिखट पदार्थ खाऊ नयेत. हे पदार्थ टॉक्सिनची पातळी खूप वाढवतात, जे शरीर आणि त्वचेसाठी चांगले नसतात.
आहारात हे पदार्थ घ्या
ग्लोइंग स्किनसाठी हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ आहारात वाढवावेत.
विशेषत: मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि ओमेगा फॅटी ॲसिड जसे की फिश ऑइल, ऑलिव्ह ऑइल, कॅनोला ऑइल आणि अक्रोड्स यांचा समावेश होतो.
चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी आहारात फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स वाढवावेत. फळे, भाज्या आणि धान्य खावे. बाहेरचे प्रक्रिया केलेले अन्न सोडून घरचे अन्न जास्त खावेत. जीवनसत्त्वे- A, B, C, E, झिंक, गॅमा लिनोलेनिक ऍसिड हे त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त.