Join us  

उन्हाळ्यात घामानं केस चिपचिपीत होतात-खाज येते? केस धुताना १ ट्रिक वापरा; सिल्की-शायनी राहतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:07 PM

Tips for hair care in summer : उन्हाळ्याच्या दिवसात केस चांगले राहण्यासााठी काही सोप्या टिप्स  पाहूया. जेणेकरून तुमच्या केसाचं नुकसान होणार नाही आणि ते  शाईनी राहतील

घामामुळे चेहऱ्याचं आणि केसांचं नुकसान होतं. त्यामुळे केस रुक्ष, कोरडे बनतात. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात केसांची काळजी घेणं महत्वाचं असतं. (Tips for Healthy and Gorgeous Summer Hair) उन्हाळ्याच्या दिवसात केसांची समस्या टाळण्यासाठी हेअर केअर रुटीन फॉलो केसं तर हा त्रास टळू शकतो. (Summer Hair Care Routine) उन्हाळ्याच्या दिवसात केस चांगले राहण्यासााठी काही सोप्या टिप्स  पाहूया. जेणेकरून तुमच्या केसाचं नुकसान होणार नाही आणि ते  शाईनी राहतील. (Tips for hair care in summer)

केस स्वच्छ ठेवा

उन्हाळ्यात जेव्हा केसांमध्ये खूप घाम येतो त्यावेळी धूळ, घाणीचे कणही जमा होतात. अशावेळी कोंडा  झाल्यानं खाज  येण्याची समस्या उद्भवते. केसांना नियमित शॅम्पूनं धुतल्यास हा त्रास टळू शकतो. यासाठी कोमट पाण्याचा वापर करा आणि केसांची मालिश करा. 

केसांना उन्हापासून कसं वाचवायचं

सुर्याच्या हानीकारक किरणांपासून वाचण्यासाठी केसांवर नेहमी स्कार्फ घ्या. टोपीचाही वापर तुम्ही करू शकता. याशिवाय लिव्ह इन कंडिशनरचा वापरही तुम्ही करू शकता. 

कंडीशनरचा वापर

उन्हाळ्यात केस खूपच कोरडे आणि रुक्ष होतात. हे टाळण्यासाठी डिप कंडिशनिंग करणं आवश्यक आहे. नारळाचं तेल, शिया बटर, मध यांसारख्या नैसर्गिक पदार्थांचा हेअर मास्क तुम्ही केसांना लावू शकता. यामुळे केस  हायड्रेट राहतात आणि पोषण मिळते.

हिटींग टुल्सचा वापर टाळा

उष्ण आणि दमट हवामानात  ब्लो ड्रायर्स,  स्ट्रेटनर्स यांसारखे हिटींग टुल्स स्टाइलिंग तुमचे केस खराब करू शकतात. उन्हाळ्याच्या महिन्यांत ही साधने टाळा आणि त्याऐवजी तुमचे केस हवेत कोरडे होऊ द्या किंवा ते सुकविण्यासाठी डिफ्यूझर वापरा.

केस ट्रिम करत राहा

निरोगी केसांसाठी केस नेहमी कापत राहणं गरजेचं आहे. दर ६ ते ८ आठवड्यांनी केस ट्रिम केल्यास केस गळणं कमी होतं आणि केस निरोगी राहतात.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स