केस पांढरे किंवा पातळ झाले असतील तर बरेच जण मेहेंदी लावतात. सफेद केस नैसर्गिकरित्या जर काळे करायचे असेल तर, मेहेंदी लावली जाते. पण सध्या बाजारात केमिकलयुक्त मेहेंदी मिळतात. जे केसांसाठी नुकसानदायक ठरतात. त्यामुळे नेहमी नॅच्युरल मेहेंदीचा वापर करा.
मेहेंदी लावल्यानंतर अनेकांची अशी तक्रार असते की ती केसांवर जास्त काळ टिकत नाही. किंवा मेहेंदीचा रंग फिकट होतो. त्यामुळे मेहेंदी लावताना कोणत्या चुका टाळायला हव्या, केसांवर मेहेंदी लावण्याचे फायदे किती? केसांवरून मेहेंदीचा रंग फिका होऊ नये, यासाठी काय करावे? पाहा(Tips for hair coloring with henna).
केसांवर मेहेंदीचा रंग दीर्घकाळ कसा टिकवून ठेवायचा?
अनेक महिलांची अशी तक्रार असते की, केसांवर मेहेंदी लावल्यानंतर त्याचा रंग फिका होतो. यासाठी मेहेंदीची पेस्ट तयार करताना काही विशेष साहित्य मिक्स करा. मेहेंदीची पेस्ट तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये एक कप ऑर्गेनिक मेहेंदी घ्या, त्यात एक चमचा हळद, मोहरीचे तेल, मेथी पावडर व पाणी मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार पेस्ट लगेच केसांवर लावा.
मेहेंदी लावताना काय काळजी घ्यावी?
- मेहेंदी लावताना नेहमी ऑर्गेनिक मेहेंदीचा वापर करावा. केमिकलयुक्त मेहेंदीचा वापर टाळावा. यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
- मेहेंदी लावल्यानंतर आपले केस नेहमी शॉवर कॅपने कव्हर करा. कारण मेहेंदी हवेमुळे कोरडी होते शिवाय, केस तुटण्याची समस्याही वाढते.
आलिया भटच्या ५ ब्यूटी टिप्स- नवरात्रात तुमच्याही चेहऱ्यावर झळकेल आलियासारखं तेज
- मेहेंदी ३ तासांवर ठेऊ नका. काही महिला रात्री केसांवर मेहेंदी लावतात, व रात्रभर केसांवर मेहेंदी लावून झोपतात. सकाळी उठल्यानंतर केस धुतात. ज्यामुळे केस अधिक कोरडे होतात.
- मेहेंदी लावण्यापूर्वी केस शाम्पूने धुवा. शिवाय प्री कंडिशनिंगही करायला विसरू नका. मेहेंदी लावल्यानंतर केस शाम्पूने धुवू नका. दुसऱ्या दिवशी तेल लावा, मग केस शाम्पूने धुवा.