आपले केस लांब, सुंदर असावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण सध्याच्या स्थितीत केसे गळण्याची समस्या लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना उद्भवते. अनियमित जीवनशैली, खाण्यापिण्यात अनियमितता यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात. (Tips for Hair Growth) सुंदर काळ्या केसांसाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर न करताही तुम्ही सुंदर केस मिळवू शकता. (Baba Ramdev simple ways and tips to prevent hair fall) योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी केमिकल्सचा वापर न करता केस वाढवण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. काही योगासन तुमची समस्या सहज सोडवू शकतात.
१) केस पुन्हा पुन्हा गळू लागले की महिलांना नाईलाजानं केस कापावे लागतात. रामदेव बाबा सांगतात रोज सकाळ संध्याकाळ ५ मिनिटं नखं एकमेकांवर घासा. केसांना तिळाचं किंवा राईचं तेल लावून मसाज करा.
२) शॅम्पूऐवजी तुम्ही आवळा, रिठा किंवा शिकेकाईचा वापर करून केस धुवू शकता. रोज सकाळी आवळा किंवा एलोवेरा ज्यूस प्या. हिरव्या भाज्यांचे अधिकाधिक सेवन करा. जास्तीत जास्त पाणी प्या. जेवणाच्या १ तासांतर पाणी प्या.
३) योगगुरू रामदेव यांच्यानुसार केसांना हेल्दी ठेवण्यासाठी घरगुती उपायांबरोबर काही योगासनं फायदेशीर ठरतील. म्हणूनच रोज कपालभाती, अनुलोम विलोम, सर्वांगासन आणि शिर्षासन करण्याची सवय ठेवा.
४) रामदेवबाबांनी आपल्या एका व्हिडिओमध्ये सल्ला देताना सांगितले की , महागडे शॅम्पू आणि कंडिशनर विकत घेऊन पैसे वाया घालवू नका. सुरूवातीला केसांना नारळाचं तेल, दही किंवा राईचं तेल लावलं जात होतं. सध्या सुगंधित तेलांचा वापर केला जातो ते केसांसाठी नुकसानकारक ठरतात.
५) जर हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाची समस्या नसेल तर 2 ते 5 मिनिटे शीर्षासन किंवा सर्वांगासन केले जाऊ शकते. ते केसांसाठी खूप चांगले आहेत. आवळ्याचा रस, पावडर आणि च्यवनप्राश घेण्याचा सल्ला दिला.
६) आवळा केसांसाठी खूप चांगला आहे दुधीचा रस आणि आवळ्याचा रस नियमित प्यायल्याने आठवडाभरात केसगळती थांबते. केस धुण्याच्या आदल्या रात्री केसांना तेल लावण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. केस धुण्यासाठी आंबट ताक किंवा दह्याचा वापर करता येऊ शकतो. यामुळे डॅड्रफ, फंगस, खाजेची समस्या दूर होते. ताकात मुल्तानी माती, नारळाचं तेल, लिंबाचा रस मिसळून लावल्यानं केस सिल्की राहण्यास मदत होते.
७) योगगुरू बाबा रामदेव यांनी खाण्यापिण्याच्या पदार्थांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. पौष्टीक आहार, फळं, भाज्यांचा आहारात समावेश करा. याशिवाय त्यांनी तळलेल्या, मसालेदार पदार्थांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. जे लोक जास्त रागवतात त्यांचे केस जास्त गळतात म्हणूनच रामदेव बाबा शांत राहण्याचा सल्ला देतात.