Lokmat Sakhi >Beauty > फक्त ७ दिवसात केसांची चांगली होईल वाढ; गळणंही थांबेल, रामदेव बाबांनी सांगितले खास उपाय

फक्त ७ दिवसात केसांची चांगली होईल वाढ; गळणंही थांबेल, रामदेव बाबांनी सांगितले खास उपाय

Tips for Hair Growth : आर्टिफिशियल सुगंधित तेल न लावण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी या तेलाला विष असं संबोधलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 01:15 PM2023-05-03T13:15:12+5:302023-05-03T15:39:41+5:30

Tips for Hair Growth : आर्टिफिशियल सुगंधित तेल न लावण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी या तेलाला विष असं संबोधलं आहे.

Tips for Hair Growth : Baba ramdev's simple ways to prevent hair fall within 7 days | फक्त ७ दिवसात केसांची चांगली होईल वाढ; गळणंही थांबेल, रामदेव बाबांनी सांगितले खास उपाय

फक्त ७ दिवसात केसांची चांगली होईल वाढ; गळणंही थांबेल, रामदेव बाबांनी सांगितले खास उपाय

 हेअर फॉलची  समस्या  जगभरातील लोकांमध्ये उद्भवत आहे. करोडो लोक दरररोज या समस्येचा सामना करतात. अनेकदा पैसे खर्च करूनही या समस्येवर समाधान मिळत नाही. काहीजण महागडी उत्पादनं केसांसाठी विकत घेतात पण तरीही केसांची वाढ व्यवस्थित होत नाही. (Tips for Hair Growth) अशावेळी कित्येक मुली केस कापणं पसंत करतात. केसाचं गळणं कमी करण्यासाठी योग गुरू रामदेव बाबांनी सुचवलेले सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात.  यामुळे  जास्त मेहनत न करता हेअर फॉल कमी होऊ शकतो. (Baba ramdev's simple ways to prevent hair fall within 7 days)

योग गुरू रामदेव बाबांनी एका व्हिडिओमध्ये महिलांना सल्ला देताना सांगितले की महागडे शॅम्पू  आणि कंडिशनर विकत घेऊन त्याचा वापर करणं टाळा.  त्यांनी आठवण करून दिली की आधीच्या काळात केसांना तिळाचं तेल, नारळाचं तेल, दही लावलं जात होतं. त्यामुळे केस दीर्घकाळ मजबूत राहायचे. आर्टिफिशियल सुगंधित तेल न लावण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी या तेलाला विष असं संबोधलं आहे.

हेअर फॉल रोखण्याचे उपाय

सगळ्यात आधी त्यांनी ५ मिनिटांपर्यंत नखांवर नखं रगडण्याचा सल्ला दिला आहे. रामदेव बाबांनी पुढे सांगितलं की, यामुळे हृदयाचे आजार, हाय बीपीची समस्या उद्भवत नाही. २ ते ५ मिनिटं शीर्षासन किंवा सर्वांगासन करून तुम्ही केसांची चांगली वाढ करू शकता.

आवळ्याचे चूर्ण, अमलाकी रसायन आणि च्यवनप्राशचे सेवन करा. आवळा केसांच्या वाढीसाठी उत्तम असतो. आवळ्याचा रस आणि दूधीचा रस नियमित प्यायल्यानं  केस गळणं रोखता येऊ शकतं. केस धुण्याच्या आदल्या रात्री केसांना तेल लावण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

केस धुण्यासाठी दही किंवा ताकाचा वापर केला जाऊ शकतो. याचे असंख्य फायदे आहेत. कोंडा, फंगस किंवा खाजेची समस्याही दूर होते. ताकात मुलतानी माती, नारळाचे तेल, लिंबाचा रस  मिसळून लावल्यास केस सिल्की आणि शायनी बनण्यास मदत होईल.

केसांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांनी आहाराकडेही लक्ष देण्यास सांगितले आहे.  हिरव्या भाज्या, फळं खावीत.तळलेल्या पदार्थांपेक्षा भाजलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला आहे. जे लोक जास्त रागावतात, चिडचिड करतात किंवा चिंतेत असतात. त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. कारण अतिरागामुळे जास्त केस गळू शकतात. 

Web Title: Tips for Hair Growth : Baba ramdev's simple ways to prevent hair fall within 7 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.