Lokmat Sakhi >Beauty > स्वच्छ धुतले तरी केसांमधून दुर्गंध येतो? 3 टिप्स, केस राहतील दाट- वास कधीच नाही येणार

स्वच्छ धुतले तरी केसांमधून दुर्गंध येतो? 3 टिप्स, केस राहतील दाट- वास कधीच नाही येणार

Tips For Healthy Hair : एलोवेरा केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो. महिलांना केसांच्या वाढीसाठी आणि केसांना चमकदार बनवण्यासाठी एलोवेराचा वापर करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 07:33 PM2023-06-30T19:33:38+5:302023-06-30T20:01:45+5:30

Tips For Healthy Hair : एलोवेरा केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो. महिलांना केसांच्या वाढीसाठी आणि केसांना चमकदार बनवण्यासाठी एलोवेराचा वापर करतात.

Tips For Healthy Hair : Easy tips to make your hair smell free Top Hair Care Tips Straight From The Experts | स्वच्छ धुतले तरी केसांमधून दुर्गंध येतो? 3 टिप्स, केस राहतील दाट- वास कधीच नाही येणार

स्वच्छ धुतले तरी केसांमधून दुर्गंध येतो? 3 टिप्स, केस राहतील दाट- वास कधीच नाही येणार

घाम आणि पावसाच्या पाण्यामुळे केस ओलसर राहतात. यामुळे स्काल्पवर मळ जमा होतो आणि केसांमध्ये दुर्गंधी येते. ही एक सामान्य समस्या आहे. (Top Hair Care Tips From The Experts) अनेकदा  केसांमधून इतका तीव्र वास येतो की कोणाच्या बाजूला बसायलाही अवघडल्यासारखं वाटतं.  ज्यांचे लांब केस असतात त्यांना रोज रोज केस धुणं शक्य नसतं. केस रोज धुवायचे म्हटलं की केसांची मूळं कमकुवत होण्याचा धोका असतो आणि केस कोरडे झाल्यानं जास्त गळू लागतात. (Easy  tips to make your hair smell free)

केस गळणं सुरू झाल्यानं  केसांची वाढही थांबते. यापासून सुटका मिळवण्यासाटी महिला हेअर स्प्रे किंवा केमिकल्सयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करतात. यामुळे केसांचा दुर्गंध येत नाही. पण केसांची शाईन आणि मजबूती टिकून राहण्यास मदत होते. काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही केसांची समस्या सोडवू शकता. (Tips for healthy hair)

एलोवेरा

एलोवेरा केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो. महिला केसांच्या वाढीसाठी आणि केसांना चमकदार बनवण्यासाठी एलोवेराचा वापर करतात. कारण  एलोवेरामध्ये व्हिटामीन ए, सी, ई, बी १२ असते. यातील गुणांमुळे केसांमधून दुर्गंध येत नाही. म्हणूनच  केसांमध्ये एलोवेराचा वापर करायला सुरूवात करा. सगळ्यात आधी एलोवेरा जेल एका वाटीत काढून केसांवर लावा. यामुळे केसांना पोषण मिळेल. याशिवाय दुर्गंधही येणार नाही.  आठवड्यातून एकदा या तेलाचा वापर करू शकता.

शिकेकाई

केसांना लांब आणि शायनी बनवण्यासाठी शिकेकाईचा वापर केला जातो.  पण केसांना दुर्गंध येत असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. यातील पोषक तत्व तुम्हाला सुरक्षित ठेवतात. म्हणून सगळ्यात आधी शिकेकाई, आवळा, कढीपत्ता आणि जास्वंदाचं फूल रात्रभर भिजवून ठेवा. 

दुसऱ्या दिवशी  पाण्यात उकळून पेस्ट बनवा. त्यानंतर आपल्या केसांना लावा. जवळपास ३० मिनिटं केसांवर ठेवल्यानंतर शॅम्पूनं केस स्वच्छ धुवा. यामुळे केसांना दुर्गंध येणार नाही. ही प्रक्रिया आठवड्यातून ३ वेळा केल्यास चांगले परीणाम दिसून येतील. केसांवरील दुर्गध टाळण्यासाठी बाजारातील उत्पादनांचा वापर करू नका. यामुळे केसांची सुंदरता टिकून राहील आणि इतर समस्याही दूर होतील.

Web Title: Tips For Healthy Hair : Easy tips to make your hair smell free Top Hair Care Tips Straight From The Experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.