पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. त्यामुळे सतत घाम येतो. अशा वातावरणात चेहेरा घामट आणि चिकट होतो. चेहेऱ्याला काही लावलं तरी ते चेहेऱ्यावर टिकतच नाही. पावसाळ्यात मेकअप (makeup in monsoon) करणं जणू अशक्य गोष्ट होते. पण पावसाळ्यात मेकअप करताना ( how to do makeup in monsoon) काही गोष्टींची काळजी घेतल्यास मेकअप टिकतो. चेहरा घामट आणि चिकट (tips for makeup intact in monsoon) होत नाही.
Image: Google
पावसाळ्यात मेकअप करताना..
1. पावसाळ्यात त्वचा एरवीपेक्षा ओलसर आणि जास्त चिकट असते. त्यामुळे चेहेऱ्यावर मेकअपच टिकत नाही अशी अनेकजणींची तक्रार असते. पावसाळ्यात चेहेऱ्यावर मेकअप टिकावा म्हणून मेकअप करण्याआधी चेहेऱ्याला बर्फानं 10-12 मिनिटं मसाज करावा. यामुळे चेहेऱ्याच्या त्वचेला थंडावा मिळतो. बर्फानं मसाज केल्यानंतर चेहेऱ्याला जोही मेकअप लावल्यास तो टिकतो. चेहेऱ्यासोबतच मानेवरची बर्फाचा मसाज करावा.
Image: Google
2. पावसाळ्यात मेकअप टिकण्यासाठी प्रायमरचा वापर करावा. प्रायमरमुळे मेकअप दीर्घकाळ टिकतो. चेहेऱ्यावर फाउंडेशन किंवा अन्य मेकअप लावण्याआधी चेहेऱ्याच्या टी झोनवर थोडा प्रायमर लावावा. कारण चेहेऱ्याला याच भागात जास्त घाम येतो.
Image: Google
3. मेकअप करताना लिक्विड फाउंडेशनऐवजी पावडर फाउंडेशनचा उपयोग करावा. यामुळे चेहेऱ्याची त्वचा चिकट , चिपचिपी होत नाही. यासाठी चेहेरा आधी क्लीन्जरनं स्वच्छ करावा. नंतर माॅश्चरायझर लावावं. नंतर वाटाण्याच्या दाण्याएवढं प्रायमर घेऊन ते चेहेऱ्यास लावावं. नंतर ब्रशच्या सहाय्यानं पावडर फाउंडेशन चेहेऱ्याला आणि मानेस लावावं. पावडर फाउंडेशनमुळे घाम शोषला जातो आणि चेहेरा कोरडा राहातो.
Image: Google
4. पावसाळ्यात मेकअप करताना लिपस्टिक अशी लावावी जी जास्त वेळ टिकून राहील. यासाठी लिक्विड मॅट लिपस्टिक वापरावी. ही लिपस्टिक लावल्यानं ओठ सुंदर दिसतात. लिक्विड मॅट लिपस्टिक जास्त वेळ टिकते. ऑफिसला जाताना किंवा प्रवासात पावडर मॅट लिपस्टिकचा वापर करावा. पावसाळ्यात लिपस्टिक ऐवजी लिप लायनरचा वापर केला तरी चालतो. या चार प्रकारच्या युक्ता मेकअप करताना वापरल्यास पावसाळ्याच्या घामट , ओलसर वातावरणातही चेहेरा छान फ्रेश दिसू शकतो.