काळेभोर, सुंदर केस कोणाला नको असतात? पण वाढत्या वयाचा आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होतो. अशावेळी स्वतःला आहे तसं स्विकारण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. अनेकजण पांढरे केस काळे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपायांचा अवलंब करतात. त्यापैकीच एक म्हणजे केसांना मेहेंदी लावणं. हेअर कलरमुळे केसांचा केमिकल्सशी संपर्क येतो त्यामुळे केस पांढरे होतात. म्हणून अनेकजण मेहेंदी लावणं पसंत करतात. मेहेंदीचे मिश्रण तयार करत असताना त्यात काही पदार्थ घातल्यास चांगला रंग येण्यास तसंच केस दाट होण्यास मदत होते.
काळा चहा
मेंहेदी तयार करत असताना त्यामध्ये तुम्ही तेल, तयार केलेला काळा चहा घाला. यामध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे तुम्हाला सर्दीचा त्रास होणार नाही. त्याशिवाय चहाचा काळेपणा त्या मेंदीमध्ये व्यवस्थित उतरून तुमच्या केसांना अधिक चांगला रंग येतो आणि तुमचे केस अधिक मऊ होतात. मेंहेंदी लावताना बीटाचा रस, अक्रोड किंवा काळा चहा असे पदार्थही मिश्रणात घालता येऊ शकतात जेणेकरून चांगला रंग येईल.
बदामाचं तेल
यासाठी तुम्हाला बदामाच्या तेलाची गरज भासणार आहे. ज्या दिवशी तुम्ही मेहेंदी लावणार असाल त्यादिवशी एका भांड्यात मेहेंदी आणि पाणी मिक्स करून घ्या त्यानंतर मंद आचेवर बदामाचं तेल गरम करून या मिश्रणात घाला. या मिश्रणाला थंड व्हायला थोडा वेळ द्या. मेहेंदी केसांना व्यवस्थित लावून सुकल्यानंतर केस स्वच्छ धुवून टाका. एक महिना आठवड्यातून एकदा हा प्रयोग केल्यानं केस काळे आणि मजबूत राहण्यास मदत होईल.
मेथी किंवा कापराची वडी
मेहेंदीमध्ये कापूर मिसळले अथवा मेथीचे दाणे मिसळले. तर केस लवकर पांढरे होत नाहीत. कारण कापरामध्ये असणारा गंध आणि मेथीच्या गुणांमुळे केसांमधील पांढरेपणा लवकर येत नाही. तसंच मेहेंदी आणि मेथीच्या एकत्रित मिश्रणाने केसांना अधिक चांगलं पोषण मिळतं. वयापूर्वी केस पांढरे होण्यापासून तुम्ही स्वतःला या मिश्रणाचा वापर करून वाचवू शकता.
१) केसांना चांगले ठेवण्यासाठी केसांना तिळाचं तेल लावा. यामुळे तुमचे केस दीर्घकाळ दाट आणि चांगले राहण्यास मदत होईल.
२) केस धुताना शक्यतो शिकेकाई साबण किंवा माईल्ड शॅम्पूचा वापर करा.