केसांना चांगल्या तेलाने मसाज केल्यास केसांची वाढ चांगली होते, केस दाट आणि चमकदार होतात, असा सर्वसाधारण समज आहे. केस दाट होण्यासाठी आणि त्यांची योग्य वाढ होण्यासाठी केसांमध्ये नियमितपणे तेल लावले पाहिजे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला यावर विश्वास ठेवत नाही. फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला, जी बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींना फिटनेसचे प्रशिक्षण देतात आणि त्यांना कर्व्ही फिगर मिळवून देण्यात मदत करतात. केसांच्या चांगल्या वाढीसाठी महत्त्वाच्या टिप्स सांगत आहेत. (Yasmin karachiwala that adding oil does not cause hair growth these factors are responsible)
यास्मिन कराचीवाला सांगतात की, ''केस गळण्याची समस्या ही आजच्या काळात खूप सामान्य समस्या आहे. केस गळणे म्हणजे शरीराचा काही भाग आपल्यापासून दूर जात आहे असे वाटते. केसांना तेल लावल्याने त्यांची वाढ होण्यास मदत होते असे सामान्यत: लोकांकडून ऐकायला मिळते. केस गळण्याची महत्त्वाची कारणे कोणती आहेत आणि त्यांच्या योग्य वाढीसाठी आपण काय केले पाहिजे हे समजून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.''
केस गळण्याची कारणं
अनुवांशिकता
तणाव आणि धूम्रपान
अव्यवस्थित आहार
आजार किंवा शस्त्रक्रिया
केस स्टाइलिंगची उत्पादने
केस गळणं थांबवण्याचे उपाय
- केस गळतीच्या समस्येने तुम्ही हैराण असाल तर उच्च प्रथिनेयुक्त आहार घ्या. उदाहरणार्थ, दूध, दही, अंडी, बदाम, चीज, चिकन इत्यादी खाल्ल्याने शरीराला प्रथिने मिळतात, त्यामुळे केसांची वाढ सुधारते आणि गळणारे केस दुरुस्त होतात.
- जास्त ताण घेतल्याने केस गळतात, अशा परिस्थितीत जर तुम्हाला निरोगी ठेवायचे असेल आणि केस वाचवायचे असतील तर मानसिक ताण घेणं कमी करा. हसत खेळत जगा.
- केसांवर जास्त उत्पादने लावणे आणि हीट स्टाइल करणे टाळा. केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे, त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितलेली औषधे घ्या.
- केसांच्या चांगल्या वाढीसाठी बायोटिन, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि झिंक सारखी सप्लिमेंट्स घ्या. यास्मिन कराचीवाला यांनी दिलेल्या या टिप्स फॉलो करून तुम्हीही तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता. कारण केस केवळ तुमचे सौंदर्यच वाढवत नाहीत तर ते आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहेत.