महिलांना फॅशन, सौंदर्य आणि शारीरिक काळजी घेण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यात ब्रा चा देखील समावेश आहे. ब्रा घातल्याने शरीर व ड्रेस शेपमध्ये दिसते. ब्रा घातल्याने स्तनाचा आकार देखील योग्य राहतो. काहींना ब्रेसियर परिधान करायला आवडते तर, काहींना नाही. ब्रा घातल्याने अनेक महिलांना गुदमरल्यासारखे वाटते. त्याची पट्टी शरीराला टोचते, ज्यामुळे त्वचेवर त्याचे चट्टे दिसतात.
स्तन जर जड असेल तर, आपल्याला नियमित ब्रा परिधान करायला लागते. सतत ब्रा परिधान केल्याने ब्राच्या पट्ट्यांमुळे खुणा दिसतात. या खुणा हलक्या करण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. जर आपल्याला हे डाग कमी करायच्या असतील तर, काही घरगुती उपाय करून पाहा. ग्रेटर नोएडा येथील ब्युटी एक्सपर्ट मोनिका राणा यांनी ब्राच्या पट्ट्यांमुळे तयार झालेले मार्क्स कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय शेअर केले आहे(Tips On Getting Rid Of Bra Strap Tan Marks On Skin).
दूध
दूध त्वचेसाठी चांगले एक्सफोलिएटर म्हणून काम करते. त्यामुळे आपण दुधाने मार्क्स काढू शकता, यासाठी दुधात गुलाब जल मिक्स करा. व १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा. या उपायामुळे त्वचेवरील टॅनिंग दूर होईल.
२ चमचे दह्यात मिसळा ४ गोष्टी, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो, मेकअपचीही गरज भासणार नाही
दही व हळद
ब्राच्या पट्ट्याच्या खुणा दूर करण्यासाठी आपण दही व हळदीचा पॅक बनवू शकता. हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, ज्यामुळे डाग दूर होतात. दह्यात चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवा आणि प्रभावित भागावर लावा. १० मिनिटानंतर त्वचा पाण्याने धुवा. ही प्रक्रिया १५ दिवस तरी करा.
लिंबू साखर स्क्रब
डाग दूर करण्यासाठी आपण लिंबू आणि साखरेचा घरगुती स्क्रब तयार करू शकता. लिंबू त्वचा उजळण्यास मदत करते आणि साखर एक्सफोलिएटर म्हणून काम करते . स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा साखर आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून मिश्रण तयार करा. हा स्क्रब डागांवर लावा. व १० मिनिटानंतर पाण्याने धुवा. ही प्रक्रिया आठवड्यातून ३ वेळा करा.
केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटते? नियमित खा ४ फळं, केस होतील लांब - होईल योग्य वाढ
या तेलाने मसाज करा
ब्युटी एक्स्पर्टच्या मते, ''ब्राच्या पट्ट्याच्या खुणा काढण्यासाठी आपण त्वचेवर ऑलिव्ह ऑईल, लॅव्हेंडर ऑइल किंवा टी ट्री ऑइलने मसाज करू शकता. असे नियमित केल्याने हे डाग हलके होतील, व निघून जातील.