Join us  

Tips For Stop Hair Fall : केस धुतल्यानंतर 'या' 7 चुका केल्यानं केस गळतात; टक्कल पडण्याआधीच केसांची घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 4:10 PM

Tips For Stop Hair Fall : घाईघाईत बाहेर जाताना ओल्या केसांवरच ब्रश फिरवला जातो. ओले केस विंचरायची सवय असल्यानं केसांचं खूप नुकसान होतं.

ठळक मुद्देसौंदर्यंतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला दीर्घकाळ केस चांगले ठेवायचे असतील तर केस धुताना काही चूका करणं टाळायला हवं.  खासकरून केस जेव्हा ओले असतील तेव्हा ७ चूका करणं टाळाओल्या केसांना सुकवण्यासाठी ब्लो ड्राय केलं जातं. केस  धुवून बाथरूमधून बाहेर येताच ब्लो ड्राय करू नका.  सगळ्यात आधी केसांवरच पाणी झटकून घ्या. मग ड्रायरचया मदतीनं ब्लो ड्राय करा. ड्रायर जास्त गरम असू नये मिडीयम ठेवून हळूहळू केस सुकवावेत.

आपले केस लांबसडक, काळेभोर असावेत असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. पण  केसांची काळजी घेणं वाटतं तेव्हढं सोपं नाही. रोजच्या जगण्यातील  लहान लहान चूका केस गळण्यासाठी कारणीभूत ठरतात. केस गळण्याच्या समस्येकडे वेळीच लक्ष दिलं नाही नैराश्याचं कारण ठरू शकतात. सौंदर्यंतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला दीर्घकाळ केस चांगले ठेवायचे असतील तर केस धुताना काही चूका करणं टाळायला हवं.  खासकरून केस जेव्हा ओले असतील तेव्हा ७ चूका करणं टाळा

1) ओल्या केसांमध्ये ब्रश फिरवू नका

घाईघाईत बाहेर जाताना ओल्या केसांवरच ब्रश फिरवला जातो. ओले केस विंचरायची सवय असल्यानं केसांचं खूप नुकसान होतं. केसातील गुंता काढण्याचा सोपा उपाय म्हणून लोक ओल्या केसांवर ब्रश किंवा कंगवा वापरतात.  केस ओले असताना खूप कमकुवत असतात अशावेळी ब्रश लावल्यानं केस तुटण्याची शक्यता असते.  तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार केस पूर्णपणे सुकल्यानंतरच त्यावर कंगवा फिरवायला हवा. 

2) ओल्या केसांवर हिटींग टूल्सचा वापर करू नका

हिटींग टूल्सचा वापर केसांसाठी हानीकारक मानला जातो. ओल्या केसांना जेव्हा तुम्ही हीट देता तेव्हा फारसा चांगला रिजल्ट दिसत नाही. याशिवाय केस खराब होतात ते वेगळं. कोणत्याही हिटिंग टूल्सचा वापर सुकलेल्या केसांवरच करायला हवा. 

3) ओले केस बांधू नका

ओल्या केसांची हेअर स्टाईल करणं किंवा साधी वेणी बांधणंही योग्य ठरत नाही. ओले केस कमकुवत असल्यानं रबर बॅण्डने केस बांधल्यास केस तुटण्याची शक्यता असते. ओले केस सुकेपर्यंत मोकळे ठेवावेत केस सुकल्यानंतर मगच व्यवस्थित बांधावेत.

4) ओल्या केसांना ब्लो ड्राय करणं

ओल्या केसांना सुकवण्यासाठी ब्लो ड्राय केलं जातं. केस  धुवून बाथरूमधून बाहेर येताच ब्लो ड्राय करू नका.  सगळ्यात आधी केसांवरच पाणी झटकून घ्या. मग ड्रायरचया मदतीनं ब्लो ड्राय करा. ड्रायर जास्त गरम असू नये मिडीयम ठेवून हळूहळू केस सुकवावेत.

5) ओल्या केसांना हवेत सुकवणं

अनेकांना वाटतं की ओल्या केसांना हवेत सुकवणं हा नैसर्गिक पर्याय आहे. पण अनेक महिलांमधला हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. हवेत केस सुकल्यानंतर जास्त कोरडे होण्याची शक्यता असते नंतर कंगव्यानं केस विंचरल्यानंतर तुटू लागतात.  टॉवेलनं जोरात घासूनही केस  पुसू नका. 

6) ओल्या केसांसह झोपणे

ओले केस असताना कधी झोपू नये. यामुळे  स्कॅल्पच्या फोलिसेल्सना नुकसान पोहोचू शकतं. जर तुम्ही रात्रीच्यावेळी केस धुतले असतील तर पूर्ण केस सुकल्यानंतरच झोपायला जा. 

7) हेअर स्प्रे लावणं

केसांवर वेगवेगळ्या स्टाईल्स करण्यासाठी हेअर स्प्रेचा वापर केला जातो.  हेअर स्प्रे सुकलेल्या केसांवर लावल्यास केस चांगले राहतात आणि स्टाईलसुद्धा चांगली दिसते. ओल्या केसांवर हेअर स्प्रे लावल्यानं काही वेळासाठी केसांचा आकार बदलू शकतो. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स