Join us  

ओठ फुटणे -काळे पडणे यावर ४ सोपे उपाय, ओठ राहतील मऊ-मुलायम-गुलाबी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 12:43 PM

Tips to Care Lips in Monsoon : पावसाळ्यात स्कीन केअर रुटीनमध्ये बदल करताना ओठांची कशी काळजी घ्यायची ते पाहू...

ठळक मुद्देओठांचे एक्सफोलिएशन केल्यास ते जास्त मऊ आणि हेल्दी दिसतात. पण आपल्या ओठांची त्वचा अतिशय नाजूक असल्याने हे आठवड्यातून एकदाच करायला हवे.चेहऱ्याच्या त्वचेबरोबरच ओठांच्या त्वचेचीही काळजी घेतल्यास ते जास्त छान दिसतील.

नुकताच उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाल्याने ऋतूबदलाच्या वेळी तर त्वचा जास्त खराब होते. पण हवामान बदलल्यावर आपली त्वचा खराब होऊ नये असे वाटत असेल तर आपल्या स्कीन केअर रुटीनमध्ये थोडे बदल करणे आवश्यक आहे. सौंदर्याच्या बाबतीत आपण चेहरा, केस, हात अशा सगळ्या गोष्टींची काळजी घेतो पण ओठांना मात्र आपण विसरतो. आपले ओठ गुलाबी, मऊ आणि रसरशीत असावेत असे प्रत्येकीला वाटतं. पण कधी ओठ खूप कोरडे पडतात तर कधी काळे होतात. कोरडेपणामुळे ओठांची त्वचा निघते आणि त्यामुळे आपल्याला नीट लिपस्टिक लावणेही शक्य होत नाही. पावसाळ्यात दमट हवामानामुळे कधी त्वचा कोरडी पडते तर कधी काळवंडते. मात्र पावसाळ्यातही आपले ओठ छान ठेवायचे असतील तर त्यांची योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यायची ते पाहूया (Tips to Care Lips in Monsoon). 

(Image : Google)

१. मॉईश्चरायजर

पावसाळयाच्या दिवसांत तुमच्या जवळ सतत लिप बाम असायला हवा. त्यामुळे तुमचे ओठ हायड्रेटेड राहतील आणि चांगले दिसतील. तुम्हाला रासायनिक घटक असलेला लिप बाम लावायचा नसेल तर तुम्ही खोबरेल तेल किंवा साजूक तूपही ओठांना लावू शकता. त्यामुळे ओठ मऊ राहण्यास नक्कीच फायदा होईल. 

२. सन प्रोटेक्शन 

आपण सूर्याच्या अतिनील किरणांपासून चेहऱ्याचे संरक्षण व्हावे यासाठी सनस्क्रीन लोशन लावतो. हे घेताना आपण पैशांचा फारसा विचार न करता चांगल्या ब्रँडचे घेतो. पण ओठांचे सूर्यापासून संरक्षण होण्यासाठी आपण काहीही लावत नाही. पण ओठ काळे पडू नयेत यासाठी तुम्ही ओठांना सन प्रोटेक्शन असलेला लिप बाम लावायला हवा. 

३. झोपण्याआधी मेकअप काढा 

आपण बाहेरुन आलो की चेहरा स्वच्छ धुतो आणि चेहऱ्याचा मेकअप काढतो. पण ओठांवर असलेली लिपस्टीक काढण्यास आपण विसरतो. रासायनिक घटक बराच काळ आपल्या ओठांवर राहिल्यास ओठांची त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे न विसरता चेहरा साफ करताना ओठही साफ करायला हवेत. 

(Image : Google)

४. एक्सफोलिएशन

एक्सफोलिएशन केल्याने आपली डेड स्कीन निघून जाते इतकेच आपल्याला माहित असते. पण त्या पलिकडे जात एक्सफोलिएशनमुळे आपला रक्तप्रवाह सुधारण्यासही मदत होते. त्यामुळे ओठांचे एक्सफोलिएशन केल्यास ते जास्त मऊ आणि हेल्दी दिसतात. पण आपल्या ओठांची त्वचा अतिशय नाजूक असल्याने हे आठवड्यातून एकदाच करायला हवे. यासाठी बाजारात मिळणाऱ्या नैसर्गिक स्क्रबचा आपण वापर करु शकतो. किंवा कॉफीसारख्या घरगुती नैसर्गिक स्क्रबही आपण ओठांचे एक्सफॉलिएशन करण्यासाठी करु शकतो.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीओठांची काळजी