Lokmat Sakhi >Beauty > ऐन तारुण्यात केस पांढरे झाल्याने म्हातारे दिसता? तज्ज्ञ सांगतात, १० सोप्या टिप्स, दिसाल नेहमी तरुण...

ऐन तारुण्यात केस पांढरे झाल्याने म्हातारे दिसता? तज्ज्ञ सांगतात, १० सोप्या टिप्स, दिसाल नेहमी तरुण...

Tips to Prevent Premature Graying of Hair by Anjali Mukerjee : केस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून काय करावे याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 02:03 PM2022-09-14T14:03:18+5:302022-09-14T14:05:36+5:30

Tips to Prevent Premature Graying of Hair by Anjali Mukerjee : केस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून काय करावे याविषयी...

Tips to Prevent Premature Graying of Hair by Anjali Mukerjee : Are you looking old with gray hair at a young age? Experts say, 10 simple tips, you will always look young... | ऐन तारुण्यात केस पांढरे झाल्याने म्हातारे दिसता? तज्ज्ञ सांगतात, १० सोप्या टिप्स, दिसाल नेहमी तरुण...

ऐन तारुण्यात केस पांढरे झाल्याने म्हातारे दिसता? तज्ज्ञ सांगतात, १० सोप्या टिप्स, दिसाल नेहमी तरुण...

Highlightsआपण घेत असलेल्या आहारातून योग्य ते पोषक घटक मिळतात की नाही ते पाहावे. समस्या निर्माण झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आधीपासूनच योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली

केस हे आपल्या सौंदर्यातील महत्त्वाची गोष्ट असून ते लांबसडक आणि घनदाट असावेत असे प्रत्येक महिलेला वाटते. मात्र वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, अनुवंशिकता किंवा आहारातून पुरेसे पोषण न मिळाल्याने आजकाल लोकांचे केस कमी वयात पांढरे होतात. वय झाल्यावर शरीरातील मेलानिन कमी झाल्याने केस नकळत पांढरे व्हायला लागतात. पण हल्ली तर अनेकदा कमी वयातच केस पांढरे झाल्याने आपण अकाली वयस्कर दिसायला लागतो. एकदा केस पांढरे व्हायला लागले की त्याला मेहंदी लावणे, डाय करणे असे काही मोजकेच पर्याय आपल्यासमोर राहतात. मात्र यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आणि पैसा असणे आवश्यक असते. तसेच सतत डाय केल्याने केसांचा पोत बिघडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे केस पांढरेच होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी हे समजून घेणे आवश्यक आहे (Tips to Prevent Premature Graying of Hair by Anjali Mukerjee ). 

केस पांढरे होण्यामागे शरीरात कॅल्शियमची, प्रथिनांची किंवा व्हिटॅमिन्सची कमतरता असणे हे महत्त्वाचे कारण असू शकते. हे घटक योग्य प्रमाणात मिळाले नाहीत तर केस लवकर पांढरे होण्यास सुरुवात होते आणि आपण म्हातारे दिसायला लागतो. केसांवर बाह्य उपाय करणे सोपे असले तरी ते दिर्घकाळ टिकणारे असतातच असं नाही. त्यामुळे आहारात योग्य ते बदल केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो आणि हा फायदा दिर्घकालीन असल्याने पुन्हा पुन्हा त्याच समस्येकडे लक्ष द्यावे लागत नाही. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी केस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या टिप्स नेमक्या काय आहेत पाहूया...

१. पुरेशी अँटीऑक्सिडंटस घ्या - भाज्या, फळे आणि सप्लिमेंटसच्या स्वरुपात यांचा आहारात समावेश करायला हवा.

२. आहारात प्रोटीन इनटेक वाढवा - अंडी, दुग्धजन्य पदार्थ, डाळी, कडधान्ये यांच्या माध्यमातून प्रोटीन जास्त प्रमाणात घेतल्यास केसांची चमक आणि टेक्श्चर सुधारण्यास मदत होते. 

३. केसांच्या मूळांची काळजी घ्या - गडद दिसव्या रंगाच्या भाज्या, केशरी आणि पिवळ्या रंगाची फळे यांचा आहारात समावेश करा. 

४. खनिजांचे प्रमाण वाढवा - झिंक, लोह, तांबे यांसारख्या खनिजांचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ आहारात वाढवा. 

५. कृत्रिम रंग आणि प्रिझर्वेटीव असलेले पदार्थ टाळा - या पदार्थांचा आपल्या पचनयंत्रणेवर विपरित परिणाम होत असल्याने असे पदार्थ आहारात टाळायला हवेत.

६. बाजारातील हेअर डाय टाळा - बाजारात मिळणारे विविध कंपन्यांचे केमिकलयुक्त हेअर डाय वापरण्यापेक्षा नैसर्गिकरित्या तयार केलेले हेअर मास्क वापरणे केव्हाही उत्तम 


७. सौम्य उत्पादने वापरा - आपण केस धुण्यासाठी, सेट करण्यासाठी किंवा अन्य काही गोष्टींसाठी जी उत्पादने वापरतो ती सौम्य असतील याची काळजी घ्या. त्यात सोडीयम लॉरियल सल्फेट असेल तर ते केसांसाठी घातक ठरु शकते. 

८. बोटांच्या टोकाने केसांना मसाज करा - केसांच्या मुळांचे रक्ताभिसरण चांगले व्हावे यासाठी अशाप्रकारे बोटाने मसाज करणे अतिशय फायदेशीर ठरते. 

९. नियमित व्यायाम करा - यामुळे रक्ताभिसरण क्रिया चांगली होते आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

१०. लो सिरम कॉपर कॉन्सट्रेशन - शरीरात तांबे कमी प्रमाणात असेल तर त्यामुळे केस लवकर पांढरे होतात. त्यामुळे आपण घेत असलेल्या आहारातून योग्य ते पोषक घटक मिळतात की नाही ते पाहावे. 

Web Title: Tips to Prevent Premature Graying of Hair by Anjali Mukerjee : Are you looking old with gray hair at a young age? Experts say, 10 simple tips, you will always look young...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.