थंडीला आता बऱ्यापैकी सुरूवात झाली आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडी भरपूर जाणवते. अशात या दिवसात त्वचा रखरखीत, कोरडी आणि निर्जीव होते. हिवाळ्यात त्वचेसोबतच केस आणि स्काल्पला देखील कोरडेपणा येतो. थंडीत वातावरणातील गारव्याचे अनेक परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवर दिसून येतात. शक्यतो, थंडीच्या दिवसांत आपल्या केसांसोबतच स्काल्पची त्वचा देखील कोरडी पडू लागते. स्काल्पला आलेल्या कोरडेपणामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात(Tips To Reduce Dryness Of Scalp Problem In Winter).
स्काल्प कोरडे पडल्याने ऐन हिवाळ्यात केसांत कोंडा होण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणावर जाणवते. स्काल्पची त्वचा कोरडी पडल्याने त्वचा उकलून निघणे, खाज येणे यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. स्काल्पच्या कोरडेपणामुळे आपले केस देखील तितकेच रुक्ष, निस्तेज आणि कोरडे दिसू लागतात. यासाठी हिवाळ्यात केस आणि स्काल्पची विशेष काळजी (How To Fight Dry Scalp In Winters) घेणे खूप गरजेचे असते. हिवाळ्यात आपल्या स्काल्पला कोरडेपणा येऊ नये तसेच केसांचे आरोग्य व सौंदर्य हिवाळ्यातही कायम टिकून राहावे, यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. हिवाळ्यात स्काल्पचा कोरडेपणा कमी करण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहूयात(4 Ways To Treat & Prevent Dry Scalp in Winter).
१. केस धुताना लक्षात ठेवा :- हिवाळ्यात केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर न करता कोमट पाणी वापरावे. गरम पाण्याचा वापर केल्याने स्काल्प कोरडी पडू शकते. तसेच, केस धुण्यासाठी सौम्य शाम्पू आणि कंडिशनरची निवड करावी.
घ्या फक्त चमचाभर साजूक तूप, पायाच्या भेगा - फुटलेले ओठ- कोरडी त्वचा होईल पुन्हा मऊ, मुलायम...
२. स्काल्पला कंडिशनर लावू नका :- हिवाळ्यात स्काल्पवर कंडिशनर लावल्यास त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवू शकते. केस शॅम्पूने धुतल्यानंतर कंडिशनर वापरावे परंतु कंडिशनर फक्त केसांसासाठीच वापरावे ते स्काल्पला लावू नये.
३. हिटिंग टूल्सचा वापर करु नये :- थंडीच्या दिवसात केस धुतल्यानंतर हेअर ड्रायरचा वापर करु नये. हेअर ड्रायरने केस वाळवल्यास ते अधिकच रुक्ष, कोरडे, निस्तेज होऊ शकतात. ड्रायरच्या मदतीने ओले स्काल्प सुकवल्यास, स्काल्पच्या कोरडेपणाची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत, स्काल्प कोरडे करण्यासाठी हेअर ड्रायर वापरू नका. केस सुकविण्यासाठी, हेअर ड्रायर वापरणार असालच तर तापमान कमी ठेवा.
हिवाळ्यात वॅक्सिंग करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, त्वचा कोरडी रखरखीत होण्याचा धोका टाळा...
४. हेअर मास्क वापरा :- जर हिवाळ्यात स्काल्पला ड्रायनेस आला असेल तर ही समस्या कमी करण्यासाठी हेअर मास्क वापरा. हेअर मास्क केस आणि स्काल्पला पोषण देण्याचे काम करतात, परंतु त्याचा योग्य वापर केल्यास स्काल्पचा कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते.