Join us  

कानाची छिद्र मोठी झाल्याने कान ओघळलेत? ३ सोपे उपाय, कानातले घालताना काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 1:21 PM

Tips To Reduce Ear Hole Size Naturally (kanache hole mothe zale upay sanga):

अनेक मुली कमी वयातच कान टोचून घेतात  आणि त्यांच्या आवडीच्या इअररिंग्स घालतात. अनेकदा मोठे कानातले घातल्यामुळे कान फाटतात तर कधी कान ओघळल्यासारखे दिसतात. (Tips To Reduce Ear Hole Size Naturally) अनेक महिलांचे इअरबोल्स असे कानातले घातल्याने डॅमेज होतात आणि कानांची छिद्र मोठी होतात. जे दिसायला अजिबात बरं दित नाही. (kanache hole mothe zale upay)अशावेळी तुम्ही सहज घातला येतील अशा  कानातल्यांची निवड करू शकता.  मोठे झालेले इअरबॉल्स व्यवस्थित करण्यासाठी लोक सर्जिकल उपायांचा अवलंब करतात. याशिवायही काही उपाय करू शकता.  फाटलेले कान रिपेअर करण्यासाठी कोणते सोपे उपाय करता येतील ते पाहूया. (How to Reduce Ear Hole Size Naturally At Home)

टुथपेस्टचा वापर करा

हा उपाय काहीसा वेळखाऊ ठरू शकतो पण हळूहळू कानांची छिद्र बंद होऊ लागतील यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करा. सगळ्यात आधी सर्जिकल टेप घ्या. छोट्या तुकड्यांमध्ये ही टेप कापून घ्या. कानांच्या  छिद्राच्या मागे चिकटवून ठेवा.  योग्य प्रमाणात टुथपेस्ट छिद्रात भरा. अतिरिक्त पेस्ट साफ करून घ्या. रात्रभर तसंच राहू द्या. दुसऱ्या दिवशी साध्या पाण्याने चेहरा धुवा. धुतल्यानंतर टुथपेस्ट स्किनला कोरडे होण्यापासून वाचवेल आणि त्वचा मॉईश्चराईज राहण्यास मदत होईल. त्यानंतर काही दिवस जड इअरिंग्स वापरणं बंद करा.

हाडांना पोकळ बनवते व्हिटामीन बी-१२ ची कमतरता; नियमित ५ व्हेज पदार्थ खा-खूप ताकद येईल

तेलाने मालिश करा

वाढत्या  वयात त्वचेची इलास्टिसिटीआणि मॉईस्चर कमी होते. कानांची त्वचा ओघळू लागते. इअरबॉल स्किनपासून वेगळे नसते. कानाची छिद्र दबाव पाडण्यासाठी छिद्र ताणली जातात. यात तुम्ही जोजाबा किंवा नारळाचे तेल नियमित वापरू शकता.  थोडं ऑलिव्ह ऑईल हातावर घ्या. त्यात एक कॉटन इअर बड बुडवा. कानांच्या छिद्रांमध्ये हे तेल लावा. त्यानंतर हळू हळू मसाज करा. चांगल्या परिणामांसाठी रोज हा उपाय करा. 

मधाचा वापर करा

मध त्वचेसाठी उत्तम मानले जाते. कानाचे छिद्र कमी करण्यासाठी मधाचा वापर फायदेशीर ठरतो. याव्यतिरिक्त त्वचेच्या मृत पेशीसुद्धा निघून जातात. रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. सगळ्यात आधी हातावर थोडं मध घ्या. आपल्या हातांनी इअरबॉल्सवर लावा. हळूहळून मसाज करा. काही दिवसांनी तुम्हाला फरक जाणवेल. 

ऐन तारूण्यात कंबरदुखीने हैराण आहात? ५ पदार्थ खा; म्हातारे झालात तरी कंबरदुखी छळणार नाही

कानांची छिद्र मोठी होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी?

1) जास्त जड इअररिग्स घालू नका.  हलके कानातले घाला. हलके कानातले कान परसवत नाही. हलका थ्रेडर किंवा इअररिग्स वापरल्याने कान चांगले राहतात.

2) झोपण्याआधी इअररिंग्स काढून मगच झोपा. झोपण्याआधी इअररिंग्स काढून झोपल्याने रात्रभरात स्किन इरिटेशन होत नाही आणि कान चांगले राहतात. 

3) तुम्ही घरात असाल तेव्हा इअररिंग्स काढून झोपल्याने रात्रभरात होणाऱ्या स्किनचे प्रोब्लेम्स टाळता येतील.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी