Lokmat Sakhi >Beauty > केस धुतल्यानंतर ४ गोष्टी करता? म्हणूनच तुमचे केस फार गळतात..

केस धुतल्यानंतर ४ गोष्टी करता? म्हणूनच तुमचे केस फार गळतात..

Tips To Reduce Hair Fall after Shampooing केस धुतल्यानंतर हमखास केल्या जाणाऱ्या चुकांमुळे केस गळतीचे प्रमाण वाढते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 06:12 PM2023-03-28T18:12:48+5:302023-03-28T18:13:38+5:30

Tips To Reduce Hair Fall after Shampooing केस धुतल्यानंतर हमखास केल्या जाणाऱ्या चुकांमुळे केस गळतीचे प्रमाण वाढते

Tips To Reduce Hair Fall after Shampooing | केस धुतल्यानंतर ४ गोष्टी करता? म्हणूनच तुमचे केस फार गळतात..

केस धुतल्यानंतर ४ गोष्टी करता? म्हणूनच तुमचे केस फार गळतात..

केसांच्या निगडीत समस्या सध्या सगळ्यांमध्ये दिसून येते. केस गळणे, केसात कोंडा तयार होणे, केसांमध्ये फाटे फुटणे, केस लवकर पिकणे, या समस्येमुळे लोकं त्रस्त आहेत. केस धुतल्यानंतर काहींचे केस खूप फ्रिझी होतात. काही महिला केस धुतल्यानंतर सुकवण्यासाठी टॉवेलचा वापर करतात. टॉवेल केसांमधील अतिरिक्त पाणी शोषून घेते. पण केसांवर टॉवेल बांधून ठेवणे ही सवयी केसांसाठी धोकादायक ठरू शकते. केस धुतल्यानंतर केसांवर टॉवेल बांधल्यामुळे केसांच्या निगडीत अनेक समस्या उद्भवू शकते(Tips To Reduce Hair Fall after Shampooing).

कोंडा आणि बुरशीजन्य संसर्ग

ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने डोके बराच काळ ओले राहते. ज्यामुळे स्काल्पवर कोंडा व बुरशीजन्य संसर्ग देखील होऊ शकतो, जे केसांसाठी हानिकारक आहे.

मेकअप न करताही सेलिब्रिटींसारखं सुंदर दिसायचंय? ५ गोष्टी- देतील तुम्हाला सुंदर ग्लो

केस कमकुवत होऊन तुटतात

ज्यांना केस गळतीची समस्या आहे, त्यांनी ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळू नये. केसांवर टॉवेल बांधल्याने कमकुवत केस ओढले किंवा तुटले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत अनेक केस मुळापासून तुटतात. अशा स्थितीत केस लवकर कोरडे होतात आणि केसांची नैसर्गिक चमक निघून जाते.

केस कोरडे होतात

आंघोळीनंतर डोके वारंवार टॉवेलने पुसल्याने केसांमध्ये कोरडेपणा येतो. यासह केसांमधील नैसर्गिक तेलही निघून जाते. नैसर्गिक तेल कमी झाल्यामुळे केस रखरखीत होतात. ज्यामुळे ते गळू लागतात.

पूजेच्या कापुराचे ३ फायदे, डेड स्किन ते पिग्मेंटेशन यावर फार उपयोगी

केस गळू लागतात

आंघोळीनंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केस गळू शकतात. कारण त्यामुळे केस ताणले जातात. असे केल्याने केसांच्या नसा कमकुवत होऊ लागतात. त्याचबरोबर केसांची चमकही नष्ट कमी होते.

Web Title: Tips To Reduce Hair Fall after Shampooing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.