Join us  

केस धुतले की घरभर केस गळून पडलेले दिसतात? शाम्पूत मिसळा १ गोष्ट, केस होतील शायनी - गळणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2023 5:44 PM

Tips To Reduce Hair Fall While Shampooing : कांदा-मेथी दाणे-कलौंजीचा तयार करा जेल, केस कधी गळत होते, हेच विसराल..

बिघडलेल्या जीवनशैलीचा दुष्परिणाम थेट आरोग्य, केस आणि त्वचेवरही दिसून येतो. अनेकदा केसांची गळती (Hair Fall) थांबतच नाही. ज्यामुळे टक्कल पडेल की काय, अशी भीतीही वाटते. पण केस गळतीमागे अनेक कारणे असू शकतात. केसांची बाहेरून याशिवाय आहारातही काही बदल करून काळजी घ्यायला हवी. बऱ्याचदा केस धुतानाही केस गळून फरशीवर पडतात. यामुळे आणखी स्ट्रेस येते.

केसांची वाढ व्हावी शिवाय, केस गळती थांबावी असे वाटत असेल तर, केस धुताना शाम्पूमध्ये (Shampooing) एक गोष्ट मिसळा. मेथी दाणे, कलौंजी आणि कांद्याचा वापर करून हेअर जेल तयार करा (Hair Care Tips). हा जेल शाम्पूमध्ये मिसळून केसांवर लावा. यामुळे नक्कीच केसांना फायदा होईल. शिवाय केस गळतीही थांबेल(Tips To Reduce Hair Fall While Shampooing).

शाम्पूमध्ये मिसळा एक घरगुती जेल

सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक चमचा कलौंजी, एक चमचा मेथी दाणे आणि एक उभा चिरलेला कांदा घालून मिक्स करा. १० मिनिटांसाठी गॅस मध्यम आचेवर ठेवा. १० मिनिटानंतर गॅस बंद करा. चहाच्या गाळणीने पाणी गाळून घ्या. तयार पाण्यात रोजच्या वापरातला एक चमचा शाम्पू घालून मिक्स करा. तयार हेअर फॉल शाम्पूने केस धुवा. यामुळे केस गळती, केसात कोंडा, पांढऱ्या केसांची समस्या सुटेल.

चेहरा चमकदार पण नाकावर हट्टी ब्लॅकहेड्स? चमचाभर टूथपेस्टची पाहा कमाल, रातोरात काळे ब्लॅकहेड्स होतील गायब

मेथी दाणे

मेथी दाणे फक्त आरोग्यासाठी नसून, केसांसाठीही फायदेशीर ठरते. त्यात असलेले प्रोटीन आणि निकोटिनिक अॅसिड केसांना आतून पोषण देते. ज्यामुळे केस आतून दाट होतात. शिवाय गळतीही थांबते.

कलौंजी

कलौंजी बियांचा वापर केसांच्या वाढीसाठी होतो. कलौंजीमधील निगेलॉन आणि थामोक्विनोन केसांच्या वाढीसाठी प्रोत्साहन देते. शिवाय केसांना योग्य मॉईस्चराईज करते. ज्यामुळे केस मऊ-मुलायम दिसतात.

केसांना तेल कोमट करून लावावे की थंडच? पाहा केसांना खोबरेल तेल लावण्याची योग्य पद्धत, केसांना मिळेल नवीन जीवन..

कांदा

कांदा फक्त फोडणीसाठी नसून, केसांची सोडवण्यासाठीही फायदेशीर ठरते. यातील सल्फर स्प्लिट एंड्स, केस गळणे इत्यादी समस्या सोडवतात. शिवाय केसांना नवीन जीवन देतात.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सहोम रेमेडी