Lokmat Sakhi >Beauty > पावसाळ्यात त्वचेला फंगल इंन्फेक्शन होऊ नये म्हणून आंघोळीच्या पाण्यात टाका २ गोष्टी, त्वचेचे आजार राहतील लांब...

पावसाळ्यात त्वचेला फंगल इंन्फेक्शन होऊ नये म्हणून आंघोळीच्या पाण्यात टाका २ गोष्टी, त्वचेचे आजार राहतील लांब...

Tips on how to avoid infection during the rainy season : Tips To Take Bath In Rainy Season To Prevent From Infection :पावसाळ्यात फंगल इंन्फेक्शनचा धोका वाढतो, आंघोळ करताना ' अशी ' काळजी घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 08:12 PM2024-07-31T20:12:49+5:302024-07-31T20:34:48+5:30

Tips on how to avoid infection during the rainy season : Tips To Take Bath In Rainy Season To Prevent From Infection :पावसाळ्यात फंगल इंन्फेक्शनचा धोका वाढतो, आंघोळ करताना ' अशी ' काळजी घ्या...

Tips To Take Bath In Rainy Season To Prevent From Infection Tips on how to avoid infection during the rainy season | पावसाळ्यात त्वचेला फंगल इंन्फेक्शन होऊ नये म्हणून आंघोळीच्या पाण्यात टाका २ गोष्टी, त्वचेचे आजार राहतील लांब...

पावसाळ्यात त्वचेला फंगल इंन्फेक्शन होऊ नये म्हणून आंघोळीच्या पाण्यात टाका २ गोष्टी, त्वचेचे आजार राहतील लांब...

पावसाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या ऋतूंत ओलावा आणि घाण पाण्यामुळे त्वचेला फंगल इंन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. काहीवेळा आपण पावसाच्या पाण्यांत भिजतो. अशावेळी त्या पाण्यामुळे देखील आपल्या त्वचेला वेगवेगळ्या प्रकारचे इंन्फेक्शन्स होऊ शकते. त्वचेला खाज सुटणे, दुर्गंध तसेच सूज येणे, पुरळ येणे, त्वचा लालसर होणे अशा अनेक समस्यांचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक असते(Tips on how to avoid infection during the rainy season).

पावसाळ्यात दमट वातावरण आणि ओलसरपणामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यात स्किन इंन्फेक्शन्सचा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर आपण दोन प्रकारचे औषधी पाणी आंघोळीसाठी वापरू शकतो. पावसाळ्यात त्वचेला फंगल इंन्फेक्शन्स होण्यापासून बचाव करण्यासाठी आपण घरगुती औषधी पाण्याचा वापर करुन त्वचेची काळजी घेऊ शकतो(Tips To Take Bath In Rainy Season To Prevent From Infection).

पावसाळ्यात आंघोळीसाठी या दोन प्रकारच्या पाण्याचा वापर करा... 

१. पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका अधिक वाढतो. अशा परिस्थितीत कडुलिंबाची पाने उकळून त्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेला झालेला संसर्ग टाळता येतो. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीसेप्टिक, अँटी-फंगल गुणधर्म असतात जे त्वचेला झालेला संसर्ग नाहीसा करु शकतात.  यामुळे त्वचेवर खाज, फोड आणि मुरुम दूर होण्यास मदत होते. त्वचेची खोलवर चांगली सफाई केली जाते. घामामुळे येणारा दुर्गंध दूर करता येतो. कडुलिंबाचे पाणी बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी आणि ३० ते ३५ कडुलिंबाची पाने घ्यावीत. आता हे पाणी चांगले उकळून घ्यावे. त्यानंतर हे पाणी थोडे थंड करुन घ्यावे.  हे पाणी रुम टेम्परेचरला आल्यावर आंघोळीच्या पाण्यात मिक्स करुन तुम्ही अशा पाण्याने आंघोळ करु शकता.    

२. पावसाळ्यात तुम्ही मिठाच्या पाण्यानेही आंघोळ करू शकता. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे त्वचेच्या संसर्गाची समस्या दूर होण्यास मदत मिळते. यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून आंघोळ करा. यामुळे त्वचेला खाज किंवा फोड येण्याची अशी कोणतीही समस्या उद्भवणार नाही. निरोगी त्वचेसाठी त्वचा क्लिन ठेवणे गरजेचे असते. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा खोलवर स्वच्छ होण्यास अधिक मदत मिळते. पाण्यात मीठ घालूंन असे तयार केलेले पाणी त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. याशिवाय ते त्वचेचे डाग, मुरुम, पुरळ कमी करण्यास फायदेशीर ठरते.

Web Title: Tips To Take Bath In Rainy Season To Prevent From Infection Tips on how to avoid infection during the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.