आपण दिवसांतून किमान दोन ते तीन वेळा चेहरा धुतो. चेहरा धुतल्याने स्किनवर चिकटलेली धूळ, माती, धूलीकण हे निघून जाऊन स्किन स्वच्छ होते. स्किन निरोगी दिसण्यासाठी चेहरा धुणे खूप महत्वाचे असते. आपला चेहरा दिवसभर उष्णता, आर्द्रता आणि धूळ यांच्या सतत संपर्कात असतो. यामुळे त्वचा निस्तेज दिसते. जर आपण आपल्या त्वचेची योग्य ती स्वच्छता ठेवली नाही तर मुरुमांसोबतच त्वचेशी संबंधित इतर समस्या उद्भवतात. यासाठीच फेस क्लिन्जिंग करणं खूप गरजेचं आहे.
जर आपण वेळोवेळी चेहरा धुतला नाही तर चेहऱ्याच्या त्वचेच्या अनेक समस्या होतात. चेहरा न धुता त्वचेची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्वचेच्या पोर्समध्ये घाण, धूळ, माती, धूलिकण जाऊन बसतात. यामुळे हळुहळु त्वचा काळी (HOME REMEDIES TO GET RID OF DULL SKIN) पडू लागते. त्वचा काळी पडल्याने त्वचेची नैसर्गिक चमक नाहीशी होऊन चेहरा डल दिसू लागतो. जर तुम्ही दिवसांतील तुमचा जास्तीत जास्त वेळ बाहेर घालवत असाल तर तुम्हाला तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये केवळ फेसवॉशच नाही तर काळेपणा दूर ठेवणाऱ्या गोष्टींचाही समावेश करावा लागेल. यासाठी चेहरा फक्त पाण्याने धुवून फेसवॉश करून चालणार नाही, यासाठी फेसवॉश करण्याआधी काही नैसर्गिक पदार्थांनी चेहऱ्याला मसाज करणे फायदेशीर ठरेल(tips & tricks face blackness will come out if you massage from this things before using facewash).
चेहेऱ्याच्या त्वचेचा काळपटपणा कमी करण्यासाठी उपाय...
१. खोबरेल तेलाने मसाज करा...
ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी चेहरा धुण्यापूर्वी खोबरेल तेलाने चेहऱ्याच्या त्वचेचा मसाज करावा. खोबरेल तेलामध्ये असलेले फॅटी ॲसिड त्वचेला हायड्रेट करतात. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते. जर तुमच्या त्वचेवर काळे डाग असतील तर ते देखील कमी होण्यास मदत होते. यामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल.
फळांच्या सालींचे फेसपॅक त्वचेसाठी गुणकारी ! मिळेल पार्लरसारखा ग्लो घरच्याघरी...
२. एलोवेरा जेलने मसाज करा...
फेसवॉश करण्यापूर्वी तुम्ही एलोवेरा जेलने देखील काही मिनिटे मसाज करू शकता. फेसवॉश करण्यापूर्वी तुम्ही मसाज केल्यास तुमच्या त्वचेतील रक्ताभिसरण सुरळीत होते आणि त्वचेतील जास्तीची चरबीही कमी होते. एलोवेरा जेलने मानेला मसाज केल्यास हळुहळु डबल चीनची समस्या देखील कमी होतो.
आंघोळ केल्यावर डोळे लालबुंद होतात ? ही असू शकतात कारणं, करा सोपे ४ उपाय...
३. बर्फाने मसाज करा...
फेसवॉश करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या स्किनला बर्फानेही मसाज करु शकता. यामुळे त्वचा चमकदार आणि तजेलदार राहते. यामुळे डोळ्यांखालील डार्क सर्कलची समस्याही कमी होते. त्वचेवरील मुरुम आणि सुरकुत्या यासाठी बर्फाने मसाज करणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
फक्त २ सिक्रेट पदार्थ लावा आणि वर्षानूवर्षे चेहऱ्यावर असणारे जुनाट डाग घालावा चुटकीसरशी...