Lokmat Sakhi >Beauty > थंडीत त्वेचेला भेगा पडतात-काळपटपणा येतो? खोबरेल तेलात मिसळा ३ पदार्थ, त्वचा राहील मऊ मुलायम कायम!

थंडीत त्वेचेला भेगा पडतात-काळपटपणा येतो? खोबरेल तेलात मिसळा ३ पदार्थ, त्वचा राहील मऊ मुलायम कायम!

Tips & Tricks To Treat Dry SkinI In Winter Apply This Thing By Adding In Coconut Oil It Will Help To Get Glowing & Smooth Skin : How To Use Coconut Oil For Skin In Winter : Natural Remedies For Skin In Winter : हिवाळ्यात ड्राय स्किनसाठी आपण खोबरेल तेल वापरतोय फक्त त्यात मिसळा हे ३ पदार्थ, त्वचेचा कोरडेपणा होईल दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2024 09:18 AM2024-11-12T09:18:49+5:302024-11-12T09:29:32+5:30

Tips & Tricks To Treat Dry SkinI In Winter Apply This Thing By Adding In Coconut Oil It Will Help To Get Glowing & Smooth Skin : How To Use Coconut Oil For Skin In Winter : Natural Remedies For Skin In Winter : हिवाळ्यात ड्राय स्किनसाठी आपण खोबरेल तेल वापरतोय फक्त त्यात मिसळा हे ३ पदार्थ, त्वचेचा कोरडेपणा होईल दूर...

Tips & Tricks To Treat Dry SkinI In Winter Apply This Thing By Adding In Coconut Oil It Will Help To Get Glowing & Smooth Skin How To Use Coconut Oil For Skin In Winter | थंडीत त्वेचेला भेगा पडतात-काळपटपणा येतो? खोबरेल तेलात मिसळा ३ पदार्थ, त्वचा राहील मऊ मुलायम कायम!

थंडीत त्वेचेला भेगा पडतात-काळपटपणा येतो? खोबरेल तेलात मिसळा ३ पदार्थ, त्वचा राहील मऊ मुलायम कायम!

हिवाळ्यात सगळ्यांनाचं सतावणारी एक कॉमन समस्या म्हणजे स्किन ड्राय होणे. थंडीत आपली स्किन ड्राय होऊन त्यावर बारीक सुरकुत्या येऊन काहीवेळा त्वचा उकलायला लागते. त्वचेच्या कोरडेपणामुळे अनेक समस्यांना समोरे जावे लागते. कोरडेपणामुळे त्वचेला खूप खाज सुटते आणि तडेही जातात, एवढच नव्हे तर हळुहळु तो भाग कोरडा पडून तिथली त्वचा काळी पडू लागते. वातावरणातील गारवा त्वचेची आर्द्रता हिरावून घेतो. अशा परिस्थितीत, आपण त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बॉडी मॉयश्चरायझर किंवा बॉडी लोशन, तेल त्वचेवर लावतो(Natural Remedies For Skin In Winter).

हवेत गारठा वाढला की हवेतील, शरीरातील आर्द्रता कमी होते आणि त्वचा कोरडी पडायला लागते. अनेकदा ही त्वचा इतकी कोरडे पडते की आपल्याला सगळीकडे खाज यायला लागते. मग आपण त्वचेला तेलाने मसाज करणे, मॉईश्चरायजर लावणे असे करुन जास्तीत जास्त मऊ ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचा उपयोग होतोच असे नाही. काही वेळा त्वचा इतकी कोरडी पडते की खाजवल्यावर त्वचेचा पांढरा कोंडाही पडतो. अशावेळी आपण काही घरगुती उपायांचा वापर करून हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्यापासून त्वचेचे संरक्षण करु शकतो. आपल्यापैकी बरेचजण हिवाळ्यात त्वेचेची काळजी घेण्यासाठी खोबरेल तेलाचा (How To Use Coconut Oil For Skin In Winter) वापर करतात परंतु फक्त खोबरेल तेलाचा वापर न करता त्यात दोन पदार्थ मिसळून लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो(Tips & Tricks To Treat Dry SkinI In Winter Apply This Thing By Adding In Coconut Oil It Will Help To Get Glowing & Smooth Skin).

खोबरेल तेलात मिसळा हे तीन पदार्थ... 

१. खोबरेल तेलात ग्लिसरीन (Glycerin) मिसळा :- हिवाळ्यात वारंवार कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी खोबरेल तेलासोबतच ग्लिसरीन वापरणे अधिक फायदेशीर ठरते. खोबरेल तेलासोबत ग्लिसरीन वापरणे हा ड्राय स्किनसाठी सर्वोत्तम उपाय आहे. खोबरेल तेल आणि ग्लिसरीन दोन्ही त्वचेला आर्द्रता पोहोचवण्याचे मुख्य कार्य करतात आणि कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात. खोबरेल तेलात त्वचेसाठी आवश्यक असे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे त्वचेला पोषण मिळवून देतात. यासाठी एका बाऊलमध्ये समप्रमाणात खोबरेल तेल आणि ग्लिसरीन मिसळा आणि या मिश्रणाने त्वचेला मालिश करून घ्या. हे मिश्रण त्वचेवर रात्रभर तसेच लावून ठेवा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.

मीरा राजपूत सांगतेय, हळद - बेसनाच्या स्क्रबचे सिक्रेट! कडाक्याच्या थंडीतही दिसेल तिच्या चेहऱ्यावर असते तशी चमक 

२. खोबरेल तेलात कॉफी पावडर (Coffee Powder) मिसळा :- काहीवेळा त्वचा इतकी कोरडी पडते की खाजवल्यावर त्वचेचा पांढरा कोंडाही पडतो. अशावेळी त्वचेला एक्सफोलिएशन करण्याची गरज असते. यासाठी आपल्या त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी खोबरेल तेलासोबत कॉफी पावडरचा वापर करावा. एक्सफोलिएशन करण्यासाठी एका बाऊलमध्ये तीन ते चार टेबलस्पून खोबरेल तेल घेऊन त्यात प्रत्येकी एक टेबलस्पून कॉफी पावडर आणि बेसन घालावे. हे मिश्रण एकत्रित करून त्वचेवर लावून हलकेच मसाज करावा. १० ते १५ मिनिटे हे मिश्रण त्वचेवर तसेच लावून ठेवावे. १५ मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.

हिवाळ्यात हातापायांवर सुरकुत्या, त्वचा रखरखीत दिसते? करा हळदीचा १ घरगुती उपाय, थंडीत त्वचा होईल मुलायम

३. खोबरेल तेलात एलोवेरा जेल (Aloe Vera Gel) मिसळा :- त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी खोबरेल तेलात आपण एलोवेरा जेल देखील मिक्स करून लावू शकता.  एलोवेरा जेल आणि खोबरेल तेल त्वचेला ओलावा मिळवून देण्यास फायदेशीर ठरतात. एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन 'ए' असते, जे कोरड्या झालेल्या त्वचेची दुरुस्ती करते. त्याचबरोबर व्हिटॅमिन 'सी' असते जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. खोबरेल तेलात एलोवेरा जेल मिक्स करून लावल्याने त्वचेच्या कोरडेपणामुळे आलेला काळपटपणा दूर करुन त्वचा उजळवण्याचे काम करते.

 

Web Title: Tips & Tricks To Treat Dry SkinI In Winter Apply This Thing By Adding In Coconut Oil It Will Help To Get Glowing & Smooth Skin How To Use Coconut Oil For Skin In Winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.