Join us  

केस गळतात म्हणून कंटाळलात? मेथीचे तेल करा - केस गळण्याचे टेन्शन नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2023 4:17 PM

Fenugreek Oil for Hair | Benefits, Results and Facts मेथी दाण्याच्या तेलापासून करा चंपी, डोकं होईल शांत, केसांची होईल वाढ..

केस गळतीची समस्या सध्या सर्वांमध्ये दिसून येते. ही समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. केसात कोंडा, केसांची मुळे नाजूक होणे, केस निर्जीव होणे अशा अनेक कारणांमुळे केस गळतीची समस्या वाढते. या समस्येवर उपाय म्हणून आपण मेथी दाण्याचा वापर करू शकता.

आयुर्वेदात मेथी दाण्यांना खूप महत्व आहे. या छोट्याश्या बियांमुळे केसांना नवीन जीवनदान मिळू शकेल. परंतु, याचा वापर कसा करावा? हे माहित असणे गरजेचं आहे. मेथी दाण्यामुळे केसांची वाढ होतेच, त्याच बरोबर पातळ केस जाड होतात. हा घरगुती उपाय आपल्या स्काल्पची योग्य काळजी घेऊ शकते(Fenugreek Oil for Hair | Benefits, Results and Facts).

एक बटाटा तुमचा चेहरा उजळवू शकतो! बटाटा वापरुन करा ४ फेसमास्क- आठवडाभरात चेहरा तजेलदार

केसांची वाढ होण्यास प्रभावशाली

मेथी दाणे लोह आणि प्रथिने यांचे समृद्ध स्रोत आहेत. यासह प्लाव संयुगाची एक अद्वितीय रचना आहे, ज्यात फ्लेवोनोइड्स आणि सैपोनिन्सचा समावेश आहे. या संयुगाला त्यांच्या अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीफंगल प्रभावांमुळे केसांची वाढ होते.

मेथी दाण्यापासून बनवा हर्बल हेअर तेल

साहित्य

लोखंडी कढई

मेथी दाणे 

खोबरेल तेल 

१ टेबलस्पून ऑलिव्ह बिया

गुढी पाडव्याला चेहरा सतेज आणि फ्रेश दिसायला हवा? १ चमचा तूप-चिमूटभर हळद- करा खास उपाय आठवडाभर

कढीपत्ता

हिबिस्कस फूल

अशाप्रकारे बनवा मेथी दाण्यापासून हर्बल तेल

 सर्वप्रथम, लोखंडी कढई गॅसवर ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात खोबरेल तेल घालून गरम करा. तेल गरम झाल्यानंतर तेलात कढीपत्ता घाला, यानंतर गॅस बंद करा. आता त्यात मेथीचे दाणे, एक टीस्पून ऑलिव्ह दाणे, हिबिस्कस फूल घालून झाकण ठेवा, हे तेल तसेच रात्रभर ठेवून द्या. सकाळी चहाची गाळणी घ्या, त्यातून हे तेल गाळून काढा. अशाप्रकारे मेथी दाण्याचे हर्बल तेल वापरण्यासाठी रेडी.

फेस वॅक्सिंग करतानाच्या वेदना का सहन करता? घरच्याघरी चिमूटभर हळद वापरुन करा वेदनारहित वॅक्सिंग

हर्बल तेलाने मसाज करण्याची पद्धत

सर्वप्रथम, केस विंचरून घ्या, आता तळहातावर हर्बल तेल घ्या. पहिले केसांच्या समोर तेल लावा, मग मागून व माथा मसाज करा.  नंतर केसांच्या मधोमध ५ वेळा हलक्या तळव्याने थाप द्या. पुढे, स्कॅल्पला मागच्या बाजूने खाली आणि वरच्या दिशेने मालिश करा. आता दोन्ही अंगठे कानांच्या वरती बंद करा. गोलाकार हालचालीत बोटांनी मसाज करा, असे केल्याने केसांची गळती थांबेल, केसांची मुळे घट्ट होतील, यासह केसांची वाढ होईल. आपण या तेलाचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स