Join us  

केसातला कोंडा कमी करायचा, उवालिखांचा त्रास? फक्त ५ रुपयांची तुरटी वापरुन करा ५ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2022 1:50 PM

White Hair Solution कमी वयात केस पांढरे झाले असतील तर, केमिकल प्रोडक्ट्सचा वापर न करता नैसर्गिक उपाय करून पहा..

आजकल कमी वयातच लोकांमध्ये केसांच्या निगडीत समस्या उद्भवू लागल्या आहेत. केस गळणे, पांढरे होणे, निर्जीव होणे अशा अनेक प्रॉब्लेम्स वाढत चालले आहे. मुख्य म्हणजे अकाली वयात केस पांढरे होणे ही समस्या सामान्य झाली आहे. केस पांढरे झाले की आपण अनेक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करू लागतो. बहुतांशवेळा याचे दुष्परिणाम आपल्या केसांना भोगावे लागते. केमिकल प्रोडक्ट्सचा वापर न करता आपण ५ रुपयात घरच्या घरी केसांना काळे करू शकता. होय, फक्त एक तुरटीचा खडा आपल्या केसांना काळेभोर करतील. तुरटीचा वापर कसा करावा जाणून घ्या. 

तुरटी आणि खोबरेल तेलाची जादू

केसांना काळेभोर आणि नवी चमक द्यायची असेल तर, तुरटी आणि खोबरेल तेल उपयुक्त ठरेल. सर्वप्रथम, एका वाटीत खोबरेल तेल गरम करा. तुरटीला चांगले बारीक करून त्याची पावडर बनवा आणि तेलात मिक्स करा. हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर थोडे थंड होण्यासाठी ठेवा. यानंतर हे मिश्रण केसांना लावा. आणि चांगले मसाज करा. हे मिश्रण अहोरात्र केसांवर ठेवा अथवा ३ ते ४ तासांनी चांगले कोमट किंवा थंड पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने केस काळेभोर यासह नवी चमक मिळेल. 

उवांपासून मिळेल सुटका

तुरटी आणि खोबरेल तेलाचे मिश्रण केसांवर एकत्र लावल्याने उवांपासून सुटका मिळेल. त्यातील ॲण्टी बॅक्टेरिअल गुण केसांमधून उवा काढण्यास मदत करतात. 

कोंडापासून आराम

तुरटी आणि खोबरेल तेल एकत्र करून लावल्याने कोंड्याची समस्याही दूर होते. या दोन्हीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे कोंड्याची समस्या दूर करतात. हिवाळ्यात खोबरेल तेल आणि तुरटीचे मिश्रण केसांना लावल्याने कोंड्याची समस्या टाळता येते.

केसांची गळती होईल कमी

तुरटी आणि खोबरेल तेल एकत्र करून लावल्याने केस गळणे थांबते. तुरटी आणि खोबरेल तेल केसांना मजबूत करतात. आणि नवीन केस वाढण्यास मदत करतात. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स