Join us  

चेहऱ्यावर खूप तीळ आहेत, आवडत नाहीत? ५ उपाय, तीळ होतील कमी लवकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 5:33 PM

Moles Beauty Remedy तीळ काही त्रासदायक नसतात, मात्र अनेकांना ते आवडत नाहीत त्यासाठी खास उपाय

तीळ हा प्रकार सहसा पूर्ण शरीरावर आढळून येतो. हा काळा डाग चेहरा आणि शरीरावरून निघत नाही. अनेकांच्या त्वचेवर साधारणतः १० ते ४० तीळ असतात. तर काहींना त्याहूनही कमी. तीळ आपल्याला लहानपणी किंवा किशोरवयीनमध्ये जास्त प्रमाणात पहावयास मिळते. काहींना तीळ आवडतो. तर, काहींना नाही. खरंतर हे तीळ निरुपद्रवी असतात. जोपर्यंत तुम्हाला त्रास होत नाही तोपर्यंत तीळ काढण्याची गरज नाही. काहींना मात्र तीळ आवडत नाही, त्यानं आपल्या सौंदर्यात बाधा येते असं त्यांना वाटतं. मात्र तीळ काढून टाकण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन स्वत:वर चुकीचे प्रयोग करण्यापेक्षा काही गोष्टी घरच्याघरी करुन पाहा.

अळशीची पेस्ट

अळशी अर्थात फ्लेक्ससीडची पेस्ट लावल्याने तीळ मऊ होतात. निघून जातात.  पेस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, एक चमचा अळशी, अर्धा चमचा अळशीचं  तेल आणि मध मिक्स करून गुळगुळीत पेस्ट बनवा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने तीळावर लावा.तासभर राहू द्या. तीळ दूर करण्यासाठी आठवड्यातून तीनवेळा ही पेस्ट तिळावर लावावी.

अननसाचा रस

अननसाचा रस हे तीळ काढण्यास खूप उपयुक्त ठरणारा उपाय आहे. ताज्या अननसातील सायट्रिक ऍसिड आठवडाभरात तीळ काढून टाकण्यास मदत करते. रस तयार करण्यासाठी, एक मध्यम आकाराचे अननस घ्या त्याचे लहान तुकडे करा. हे तुकडे मिक्सरमध्ये मिसळल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा आणि आठवडाभरासाठीचा साठा तयार करून ठेवा. रसात स्वच्छ कापसाचा गोळा भिजवा आणि दर दोन तासांनी तीळावर लावा. याने तीळ मऊ होऊन ते बाहेर निघेल.

ॲपल साईडर व्हिनेगर

ॲपल साईडर व्हिनेगर हे अनेक कारणांसाठी वापरले जाते. त्याचे अनेक औषधी गुणधर्म शरीरातील प्रत्येक घटकांसाठी उपयुक्त ठरलेलं आहे. तीळ काढण्यासाठी देखील ॲपल साईडर व्हिनेगर खूप किफायतशीर ठरेल. सर्वप्रथम, अर्धा कप ॲपल साईडर व्हिनेगर अर्धा कप पाण्यात मिसळा आणि डब्यात साठवून ठेवा. झोपण्यापूर्वी या मिश्रणात कापसाचा गोळा बुडवून तीळावर लावा. मलमपट्टीने सुरक्षित करा आणि रात्रभर ठेवा. सकाळी उठून कच्च्या खोबरेल तेलाने हलक्या हातांनी मसाज करा. एका आठवड्यासाठी किंवा तीळ निघेपर्यंत दररोज हे मिश्रण तिळावर लावा. फरक लवकर जाणवेल.

कांद्याचा रस

कांदा हे फक्त जेवणासाठी नसून शरीरातील इतर कारणांसाठी देखील गुणकारी ठरला आहे. कांद्याचा रस तिळापासून मुक्त होण्यास मदत करतो आणि त्याच्या अम्लीय गुणधर्मांमुळे त्वचेवर डागही राहत नाही. एक छोटा कांदा चिरून मिक्सरमध्ये काही चमचे लिंबाचा रस घालून बारीक करा. स्वच्छ कॉटन पॅडच्या मदतीने हा रस तीळावर लावा.  ३० मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा. तिळापासून मुक्त होण्यासाठी, तुम्हाला एक किंवा दोन आठवडे दररोज हा रस लावावा लागेल..

काजू

काजूमध्ये असे गुणधर्म आहेत जे नैसर्गिकरित्या तीळापासून मुक्त होण्यास मदत करतात. मूठभर काजू रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्ही आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता. तीळावर पेस्ट लावा आणि तासभर कोरडे राहू द्या. हे मिश्रण दिवसातून दोनवेळा तिळावर लावा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडी