आजकाल केस गळतीची समस्या प्रत्येक वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येते. खराब जीवनशैली आणि केसांची योग्य निगा न राखल्यामुळे ही समस्या उद्भवत आहे. केस गळतीचे अनेक कारणे असू शकतात. केसांना योग्य पोषण मिळत नसल्यामुळे केस गळतीची समस्या वाढत आहे. याशिवाय हार्मोनल बदलावांमुळे केसांवर गंभीर परिणाम होतो. आहारात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, सेलेनियम, लोह, जस्त, नियासिन, फॅटी ॲसिडस्, बायोटिन, अँटिऑक्सिडंट्स इत्यादींचा अभाव ही केस गळण्याची मुख्य कारणं आहेत.
याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोकं महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. काही प्रोडक्ट्स केमिकलयुक्त असल्यामुळे त्याचा केसांवर दुष्परिणाम होतो. याने केस अधिक गळतात. जेव्हा केस प्रचंड प्रमाणावर गळतात, तेव्हा केस विरळ आणि टक्कल पडू लागते, टाळू दिसू लागते. शक्य तितक्या लवकर उपचार न घेतल्यास ही समस्या अधिक वाढत जाते. केसांची गळती थांबविण्यासाठी काही पदार्थांचा आजच आहारात समावेश करा.
पालक
केसांना आपल्या आर्यनची नितांत गरज असते, जी आपण पालक हिरव्या भाज्या खाऊन भरून काढू शकता. याच्या सेवनाने केस गळण्याची समस्या कमी होईल. पालक व्यतिरिक्त इतर हिरव्या भाज्यांना आहाराचा भाग बनवा. केसांसह शरीराला योग्य पोषण मिळेल.
व्हिटामिन सी
केसांच्या वाढीसाठी, आपल्या आहारात व्हिटामिन सी युक्त असलेल्या पदार्थांचा समावेश करा. यात लिंबू, संत्री, किवी इत्यादी लिंबूवर्गीय फळांचे सेवन करा. त्यामुळे केस आणि त्वचा दोन्ही चमकदार होतात.
अक्रोड
अक्रोड हे एक असे ड्राय फ्रूट आहे, ज्याच्या सेवनाने संपूर्ण पोषण मिळते. हे केस दाट करण्याचे काम करते. केसांची उत्तम निगा राखण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे सेवन केले पाहिजे. जे अक्रोड शिवाय बदाम आणि जवसाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने केसांना बळ मिळते.
गाजराचा रस
केस गळणे थांबवायचे असेल तर गाजराचा रस पिणे सुरू करा. त्यातील पौष्टिक तत्वे केस गळती यासह डोळ्यांची निगा राखण्यासाठी मदतगार आहे. याशिवाय व्हिटॅमिन ए ने भरपूर असलेले सर्व पदार्थ खावे.
कडधान्ये
भिजवलेल्या कडधाण्यांमधून भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात. कडधान्ये ही झिंकचा एक उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. तसेच, लोह, बायोटीन आणि फोलेट सारखे पोषक घटक देखील कादाधान्यांमधून मिळतात. ज्यामुळे केसांचे आरोग्य टिकून राहण्यास मदत मिळते.