Join us  

चेहरा चमकदार पण नाकावर हट्टी ब्लॅकहेड्स? चमचाभर टूथपेस्टची पाहा कमाल, रातोरात काळे ब्लॅकहेड्स होतील गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2023 3:46 PM

Toothpaste Pack To Clean Blackheads : ब्लॅकहेड्स असो किंवा व्हाइटहेड्स, टूथपेस्टचा पाहा सोपा उपाय, चेहरा होईल क्लिन-दिसाल फ्रेश..

आपल्यापैकी अनेकांना ब्लॅकहेड्सच्या (Blackheads) समस्येला तोंड द्यावे लागते. ब्लॅकहेड्समुळे चेहऱ्यावरील सौंदर्य (Skin Care) काही अंशी कमी होते. चेहऱ्यावरील मृत पेशींखाली तेल साचते. शिवाय ते हवेच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडायझेशन होऊन ब्लॅकहेड्स तयार होतात. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी आपण विविध उपाय करतो. पार्लरमध्ये जास्त खर्चही करतो. पण अनेक उपाय करूनही फायदा होत नाही.

ब्लॅकहेड्स काही केल्या निघत नाही. ब्लॅकहेड्स अधिक करून नाकावर किंवा नाकाच्या बाजूला दिसतात. ज्यामुळे चेहरा जरी स्वच्छ असला तरी, नाकावरील ब्लॅकहेड्मुळे चेहरा अधिक खराब दिसतो. हट्टी ब्लॅकहेड्स काढणे खूप कठीण, पण घरगुती टूथपेस्टच्या वापराने आपण काढू शकता. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी टूथपेस्टचा वापर कसा करावा? पाहूयात(Toothpaste Pack To Clean Blackheads).

चेहऱ्यावर खूप केस आहेत? करून पाहा ५ रुपयांच्या तुरटीचा १ सोपा उपाय, काही मिनिटांत त्वचा उजळेल

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय

टूथपेस्ट

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी आपण टूथपेस्टचा वापर करू शकता. टूथपेस्टचा वापर फक्त दात घासण्यासाठी नसून, ब्लॅकहेड्स काढण्यासाठीही होऊ शकते. यासाठी एका वाटीत एक चमचा टूथपेस्ट घ्या. त्यात चिमुटभर मीठ, एक टेबलस्पून लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार पेस्ट नाकावर लावा. ५ मिनिटानंतर नाक घासून स्वच्छ करा. आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. या उपायामुळे काही दिवसात फरक दिसेल.

चमचाभर शाम्पूत मिसळा १ चमचा हळद, हा सोपा उपाय करा - केस गळतीवर सापडेल उत्तम उपाय

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा फक्त जेवण तयार करण्यासाठी नसून, ब्लॅकहेड्स काढण्यासाठीही उपयुक्त ठरू शकते. यासाठी एका वाटीत एक चमचा बेकिंग सोडा घ्या, त्यात दोन चमचे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. घट्टसर पेस्ट नाकावर १० ते १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर पाण्याने स्वच्छ करा. बेकिंग सोडा एक्सफोलिएटर म्हणून काम करते. ज्यामुळे चेहऱ्यावरील तेलही शोषून घेते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी