Join us  

ब्रायडल गोल्डन ग्लो हवाय? मग मधात मिसळा २ गोष्टी; दिसाल इतके सुंदर की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2024 2:47 PM

Top 2 Honey Face Packs For Glowing Skin & Benefits : तिशीनंतर मुरुमांचे डाग-सुरकुत्यांपासून त्रस्त? मधाचा करून पाहा जादूई उपाय..

वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर देखील फरक दिसून येतो. स्किन डल होणे, सुरकुत्या, फाईन लाईन्स, यासह चेहऱ्यावर मुरुमांचे डाग. यामुळे स्किन अधिक खराब होते. बऱ्याचदा आपण स्किनची भरपूर काळजी घेतो. विविध प्रकारचे सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. यामुळे स्किन बेदाग दिसेलच असे नाही (Beauty Tips). तिशीनंतर सुरकुत्या आणि मुरुमांच्या डागांमुळे सौंदर्यात बाधा निर्माण होते. असे होऊ नये म्हणून केमिकल उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून पाहा.

फक्त मधात २ गोष्टी मिसळल्यानेही स्किनच्या अनेक समस्या सुटतात (Honey For Skin). चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि मुरुमांचे डाग घालवण्यासाठी आपण मधाचा वापर करू शकता. या उपायामुळे चेहऱ्यावर नक्कीच नैसर्गिक तेज येईल(Top 2 Honey Face Packs For Glowing Skin & Benefits).

चेहऱ्यासाठी मधाचा वापर

मध फक्त आरोग्यासाठी नसून, चेहऱ्यासाठी देखील फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेला अनोखे फायदे मिळतात. मध नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. ज्यामुळे त्वचेतील घाण साफ होते. यासह त्यात अँटी ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत.

थ्रेडिंग नको वाटतं? लिंबाच्या रसात मिसळा २ गोष्टी, चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढण्याची सोपी ट्रिक

मधात मिसळा २ गोष्टी

मध आणि मुलतानी माती

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी मध आणि मुलतानी मातीचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी एका वाटीत एक चमचा मुलतानी माती घ्या, त्यात एक चमचा मध घालून मिक्स करा. आपण त्यात थोडे पाणी देखील मिक्स करू शकता. तयार पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. नंतर चेहऱ्यावर पेस्ट लावा. १५ मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. आपण याचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

महागडे सिरम सोडा - रात्री झोपताना लावा ‘या’ २ पैकी १ तेल; चेहरा दिसेल कायम फ्रेश-चमकदार

मध आणि दूध

मध आणि कच्च्या दुधाचा वापर करून आपण चेहऱ्यावरील डाग दूर करू शकता. यासाठी एका वाटीत एक चमचा मध आणि एक चमचा दूध समान प्रमाणात मिसळून घ्या. तयार पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावून ठेवा. १० मिनिटानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. दुधातील गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी