Lokmat Sakhi >Beauty > भरीव-दाट-रेखीव भुवयांसाठी खास उपाय, खोबरेल तेल आणि कलौंजी- भुवया होतील अतिशय सुंदर

भरीव-दाट-रेखीव भुवयांसाठी खास उपाय, खोबरेल तेल आणि कलौंजी- भुवया होतील अतिशय सुंदर

Best Home Remedies For Thick Eyebrows : सतत आयब्रो करुन करुन बिघडलेल्या विरळ झालेल्या भुवया पुन्हा दाट करण्यासाठी खास उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2023 06:49 PM2023-10-09T18:49:48+5:302023-10-09T19:11:07+5:30

Best Home Remedies For Thick Eyebrows : सतत आयब्रो करुन करुन बिघडलेल्या विरळ झालेल्या भुवया पुन्हा दाट करण्यासाठी खास उपाय...

Top 3 Easy Ways to Grow Thick Eyebrows Naturally, Best Home Remedies For Thick Eyebrows | भरीव-दाट-रेखीव भुवयांसाठी खास उपाय, खोबरेल तेल आणि कलौंजी- भुवया होतील अतिशय सुंदर

भरीव-दाट-रेखीव भुवयांसाठी खास उपाय, खोबरेल तेल आणि कलौंजी- भुवया होतील अतिशय सुंदर

आपला चेहरा आखीव - रेखीव व सुंदर दिसण्यात डोळ्यांवरील भुवया मुख्य भूमिका बजावतात. जाड, भरीव, लांब भुवया एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यात नक्कीच भर पाडतात. अशा रेखीव भुवया प्रत्येकीला हव्या असतात पण काहीजणींच्या भुवया या खूपच पातळ असतात. भुवयांचे केस पातळ व विरळ असल्यामुळे भुवयांना हवा तसा (How can I thicken my eyebrows naturally?) लूक मिळत नाही. अशावेळी आपल्या भुवया जाड व भरीव दिसाव्यात यासाठी कित्येक स्त्रिया आयब्रो पेन्सिलचा वापर करतात. आयब्रो पेन्सिलचा वापर केल्याने भुवया छान दिसतात परंतु हा काय कायमचा उपाय नसतो(Simple Home Remedies To Grow Thicker Eyebrows Naturally).

आजकाल अनेक स्त्रिया डोळ्यांच्या भुवया दाट करण्यासाठी मायक्रोब्लेडिंग आणि लॅमिनेशन यांसारख्या महागड्या ट्रिटमेंट्स करुन घेतात. परंतु या महागड्या ट्रिटमेंट्सचे काही तोटे देखील आहेत. काहीवेळा या ट्रिटमेंट्स सगळ्यांच्याच त्वचेला सूट होतील अशा नसतात. पण ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पैसा खर्च करण्याऐवजी घरगुती उपाय करूनही आपण आपले आयब्रो नैसर्गिक पद्धतीने भरीव व दाट करु शकतो. भुवया जाड व भरीव करण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्स करण्यापेक्षा रोजच्या वापरातील खोबरेल तेल व कलौंजीचा वापर (Top 2 Easy Ways to Grow Thick Eyebrows Naturally) करुन भुवया अधिक आकर्षक बनवता येऊ शकतात. भुवयांना दाटपणा येण्यासाठी खोबरेल तेल व कलौंजीचा वापर नेमका कसा करावा ते पाहूयात( 2 Simple Remedies To Grow Thicker Eyebrows Naturally).   

भुवयांचे केस पातळ का होतात ?

भुवयांचे केस पातळ होण्यामागे अनेक कारण असू शकतात. काहीवेळा ओव्हर प्लकिंगमुळे भुवया पातळ होऊ लागतात. अनुवंशिकता, संसर्ग किंवा त्वचेच्या कोणत्याही गंभीर स्थितीमुळे अनेक महिलांच्या भुवया खराब होतात. त्याचबरोबर तणाव आणि चिंता यामुळे देखील भुवयांचे केस गळतात.  

स्किन स्पेशालिस्ट सांगतात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत, केसगळती - पांढरे केस समस्याच संपतील...

भुवया दाट करण्यासाठी खोबरेल तेल कसे लावावे ? 

थोडेसे खोबरेल तेल घेऊन ते कोमट गरम करुन घ्यावे. गरम केल्यानंतर हे खोबरेल तेल कापसाच्या मदतीने भुवयांवर लावावे. गरम लेट भुवयांवर लावताना भुवयांच्या केसांच्या वाढीच्याच दिशेने शक्यतो कापूस फिरवावा. भुवयांच्या अगदी वर आणि खाली त्वचेला देखील तेल लावावे. त्यानंतर बोटांनी हलकेच मसाज करुन घ्यावा. रात्रभर हे तेल भुवयांवर तसेच लावून ठेवावे. सकाळी वाईप्सने पुसून मग चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. 

केस खूपच गळत आहेत ? 'या' सोप्या पद्धतीने केस विंचारल्यास केस गळणे होईल बंद...

भुवया दाट होण्यासाठी खोबरेल तेलाचे फायदे :- 

खोबरेल तेल भुवयांच्या केसांच्या वाढीस आणि अधिक भरीव करण्यास मदत करतात. नारळाच्या तेलामध्ये मॉइश्चरायझिंग आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे आपल्या भुवयांना निरोगी ठेवण्यासाठी ओलावा आणि पोषण देतात. याशिवाय, खोबरेल तेलात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म देखील आहेत की ते कोणत्याही प्रकारच्या संसर्गास प्रतिबंध करून डोळ्यांच्या भुवया वाढविण्यात मदत करतात.

भुवया दाट करण्यासाठी कलौंजीचा वापर कसा करावा ? 

कलौंजीच्या बियांची बारीक पूड करुन घ्यावी. एका बाऊलमध्ये ही बारीक केलेली पूड घेऊन त्यात ऑलिव्ह ऑईल व ताजा कोरफडीचा गर घालून हे मिश्रण मिक्स करुन घ्यावे. आता सर्वात आधी एक सुती कपडा पाण्यांत भिजवून त्याने आपल्या भुवया  स्वच्छ पुसून  घ्याव्यात. त्यानंतर हा कलौंजीचा पॅक हलक्या बोटांनी भुवयांवर पसरवून लावावा. २० मिनिटे हा पॅक भुवयांवर असाच राहू द्यावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. चेहरा धुतल्यानंतर बोटावर ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब घेऊन त्याने आयब्रोला २ ते ३ मिनिटे मसाज करुन घ्यावा. ऑलिव्ह ऑईल व खोबरेल तेलाच्या वापराने भुवयांच्या भागातील ब्लड सर्क्युलेशन चांगले होऊन भुवयांचे केस वाढण्यास तसेच भरीव होण्यास मदत होते.

देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...

नवरात्रात सुंदर दिसावं म्हणून चेहऱ्याला ब्लिच करताय ? ६ गोष्टी विसरु नका, चेहरा व्हायचा खराब...

भुवया दाट होण्यासाठी कलौंजीचे फायदे :- 

भुवयांसाठी कलौंजीचा वापर केल्याने भुवयांचे गळणारे व पातळ झालेले केस भरीव व दाट बनवण्यास मदत होते. इतकेच नाही तर भुवयांना चमक येण्यातही याची खास मदत होते. कलौंजीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे केसांचे नुकसान होण्यापासून बचाव करतात. जर तुमच्या भुवयाचे केस पांढरे दिसू लागले असतील तर या कलौंजी पॅकचा वापर नक्की करा.   

Web Title: Top 3 Easy Ways to Grow Thick Eyebrows Naturally, Best Home Remedies For Thick Eyebrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.