Lokmat Sakhi >Beauty > पिंपल्स फुटून चेहऱ्यावर काळे डाग पडलेत ? ३ सोपे उपाय, किचनमधील हे खास पदार्थ काळे डाग कायमचे दूर करतील...

पिंपल्स फुटून चेहऱ्यावर काळे डाग पडलेत ? ३ सोपे उपाय, किचनमधील हे खास पदार्थ काळे डाग कायमचे दूर करतील...

Best Ways to Reduce Dark Spots On The Face : चेहऱ्यावरील काळे डाग कमी करून त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी वापरा किचनमधील हे खास ३ पदार्थ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 10:22 PM2023-10-19T22:22:44+5:302023-10-19T22:39:14+5:30

Best Ways to Reduce Dark Spots On The Face : चेहऱ्यावरील काळे डाग कमी करून त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी वापरा किचनमधील हे खास ३ पदार्थ....

Top 3 Hacks To Remove Dark Spots Caused By Pimples With Natural Home Remedies. | पिंपल्स फुटून चेहऱ्यावर काळे डाग पडलेत ? ३ सोपे उपाय, किचनमधील हे खास पदार्थ काळे डाग कायमचे दूर करतील...

पिंपल्स फुटून चेहऱ्यावर काळे डाग पडलेत ? ३ सोपे उपाय, किचनमधील हे खास पदार्थ काळे डाग कायमचे दूर करतील...

चेहऱ्यावरचे पिंपल्स, मुरूम, पुटकुळ्या फुटल्यावर त्याचे काळे डाग आपल्या त्वचेवर तसेच राहतात. हे डाग काहीवेळा त्वचेवरुन निघून जातात किंवा तसेच राहतात. हे काळे डाग जर चेहऱ्यावर तसेच राहिले तर त्वचेवर असे काळे डाग दिसताना ते व्यवस्थित दिसत नाहीत. त्याचबरोबर काहीवेळा काही केल्या हे चेहऱ्यावरचे डाग जाता जात नाही. चेहऱ्यावरचे हे काळे डाग घालवण्यासाठी काहीजण अनेक प्रकारचे प्रयत्न करतात. आपण हे चेहऱ्यावरचे काळे डाग घालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या क्रिम्स, लोशन यांचा वापर करतो(How can I reduce dark spots on my face naturally).

चेहरा तेव्हाच सुंदर दिसतो जेव्हा त्यावर कोणतेही डाग नसतात. चेहर्‍यावरील काळे डाग (How to Get Rid of Dark Spots on the Face) दूर करण्यासाठी अनेक उत्पादने वापरली जातात. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग (3 Natural Remedies To Get Rid Of Dark Spots) पडतात. हे काळे डाग कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली उत्पादने किती प्रभावी आहेत, हे प्रत्येकाच्या त्वचेवर अवलंबून असते. परंतु या प्रॉडक्ट्समधील रासायनिक घटकांमुळे एक तर ही समस्या आणखी वाढते किंवा त्वचेच्या इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या कारणांनी आलेले फोड, पुरळ या समस्या कालांतराने कमी होतात, पण चेहऱ्यावरचे काळे डाग (Top 3 Hacks To Remove Dark Spots Caused By Pimples With Natural Home Remedies) मात्र तसेच राहतात. हे डाग आले की आपण अस्वस्थ होऊन जातो. असे असले तरीही आपण काही घरगुती उपायांचा वापर करून चेहर्‍यावरील काळे डाग कमी करू शकतो(Home Remedies To Remove Dark Spots on the Face Overnight Naturally).

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी नेमके काय करावे ? 

१. लाल मसूर :- चेहऱ्यावरचे काळे डाग घालवण्यासाठी आपण लाल मसूरचा वापर करु शकतो. लाल मसूर त्वचेला एक्सफोलिएट करण्यापासून ते चमकदार बनवण्यासाठी फार उपयुक्त ठरते. त्वचेसाठी फायदेशीर मानल्या जाणार्‍या लाल मसूरमध्ये अँटी - ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणांत असतात. चेहऱ्यावरील गडद डागांवर उपचार करण्यासाठी आपण लाल मसूर पावडरचा वापर करु शकता. एका भांड्यात २ ते ३ टेबलस्पून मसूर डाळ घेऊन ती रात्रभर पाण्यात भिजत ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी ही मसूर डाळ मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यावी. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटे तशीच लावून ठेवावी. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. ही पेस्ट आठवड्यातून २ ते ३ वेळा चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत मिळते. मसूर डाळ चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील घाण निघून जाते. या पेस्टचा वापर केल्याने त्वचा चमकदार दिसू लागेल. ही पेस्ट त्वचेचा टोन एकसमान करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. 

डाएटमध्ये करा ४ पदार्थांचा समावेश, चेहरा दिसू लागेल तरुण - सुरकुत्या गायब...

२. काकडी :- काकडी ही त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. काकडीच्या वापराने काळ्या वर्तुळापासून ते कोरड्या त्वचेपर्यंतच्या समस्या कमी केल्या जाऊ शकतात. काकडीत अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, सिलिका भरपूर प्रमाणात असतात, जे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत करतात. काकडीचे बारीक काप करून ते मिक्सरला लावून त्याची पातळ पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटे तशीच लावून ठेवावी. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. काळ्या डागांवर ही पेस्ट रोज लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग हळूहळू कमी होतात. 

काजळ जरुर लावा, पण हमखास होणारी १ चूक टाळा, नाहीतर डोळे व आजूबाजूची त्वचा होईल खराब...

३. टोमॅटो :- अनेकवेळा जास्त काळ सूर्यप्रकाशात राहिल्याने चेहऱ्यावर काळे डाग पडतात. अशावेळी हे काळे डाग घालवण्यासाठी टोमॅटोचा वापर करावा. टोमॅटोमध्ये लायकोपीन असते, जे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. हे सर्व घटक त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवण्यास मदत करतात. टोमॅटो कापून त्यातील लगदा बाहेर काढून या लगद्याने १५ ते २० चेहऱ्यावर मसाज करून घ्यावा. शेवटी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. आठ्वड्यातून ३ ते ४ वेळा याचा वापर केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते.

'जेड रोलर' म्हणजे काय ? त्यानं चेहऱ्याला मसाज केला तर चेहऱ्याच्या सगळ्या समस्या गायब होतात, हे खरं आहे ?

Web Title: Top 3 Hacks To Remove Dark Spots Caused By Pimples With Natural Home Remedies.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.