Lokmat Sakhi >Beauty > डोक्यावर पांढरे केसच पुष्कळ आलेत? जेवणाच्या ताटात हे ५ नेहमी  घ्या, काळा होईल प्रत्येक केस

डोक्यावर पांढरे केसच पुष्कळ आलेत? जेवणाच्या ताटात हे ५ नेहमी  घ्या, काळा होईल प्रत्येक केस

Top 5  Foods To Darken Premature White Hairs : कढीपत्ता एंटी ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन  बी नं परीपूर्ण असतो. ज्यामुळे हेअर फॉलिकल्सना फायदे मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 12:24 IST2024-12-15T12:16:29+5:302024-12-15T12:24:54+5:30

Top 5  Foods To Darken Premature White Hairs : कढीपत्ता एंटी ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन  बी नं परीपूर्ण असतो. ज्यामुळे हेअर फॉलिकल्सना फायदे मिळतात.

Top 5 Foods To Darken Premature White Hairs : Which Food Items Helps To Darken Premature White Hairs  | डोक्यावर पांढरे केसच पुष्कळ आलेत? जेवणाच्या ताटात हे ५ नेहमी  घ्या, काळा होईल प्रत्येक केस

डोक्यावर पांढरे केसच पुष्कळ आलेत? जेवणाच्या ताटात हे ५ नेहमी  घ्या, काळा होईल प्रत्येक केस

वेळेआधी केस पांढरे होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. खाण्यापिण्यात पोषक तत्वांची कमतरता,  केसांची योग्य देखभाल न करणं, ऊन्हाचा प्रभाव, जेनेटिक्स या कारणांमुळे केस पांढरे होऊ शकतात. (Hair Care Tips) कमी वयात  केस पांढरे होत असतील तर यामागे पोषक तत्वांची कमतरता हे मोठं कारण असू शकतं. शरीराला योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळाली नाहीतर तर  केस  पांढरे होऊ लागतात. कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास केस काळेभोर होण्यास  मदत होते ते समजून घेऊ. (6 Foods To Darken Premature White Hairs)

केस काळे करण्यासाठी काय खावे?

आहारात पालकाचा समावेश केल्यास केसांवर चांगला परिणाम दिसून येतो. पालकात आयर्न मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे हेअर फॉलिकल्सना ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचतो. यामुळे केसांचा काळा रंग टिकून राहतो आणि केस पांढरे होण्याची समस्या उद्भवत नाही.

रश्मिका मंदानाच्या लाईट वेट साड्यांचे १० लूक; पार्टी असो की लग्नसोहळा-साधेपणातही सौंदर्य उजळेल

आवळा

केसांवर आवळा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं वापरू शकता. आवळा केसांना लावल्यास केस गळणं थांबवता येतं. केसांना काळा रंग येण्यासाठी आवळ्याचा हेअर डाय बनवला जातो आणि याचे अनेक फायदे मिळतात. आवळ्यात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते.

सकाळी संडासला नीट होत नाही? चपातीच्या कणकेत १ पदार्थ मिसळा; सकाळी उठताच पोट साफ

अक्रोड

केसांना अक्रोडमधून बायोटीन मिळते. बायोटीन हेअर टिश्यूजना मजबूत बनवते आणि केसांन नॅच्युरली काळा रंग देते. अशा स्थितीत तुम्ही अक्रोडचा आहारात समावेश केल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होते. स्नॅक्स, स्नॅक्समध्ये किंवा गार्निशिंगसाठी याचा वापर केला जातो. 

तीळ

काळे केस मिळवण्यासाठी तुम्ही आहारात  तिळाचा समावेश करू शकता. तिळामुळे मेलानिन प्रोडक्शन वाढवण्यास मदत होते.  ज्यामुळे केस काळेभोर राहण्यास मदत होते. तिळात आयर्न, जिंक मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे  केसांना बरेच फायदे मिळतात.

कढीपत्ता

कढीपत्ता एंटी ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन  बी नं परीपूर्ण असतो. ज्यामुळे हेअर फॉलिकल्सना फायदे मिळतात. ही पानं खाल्ल्यानं  केस पांढरे होण्याची प्रक्रिया संध गतीनं होते. याव्यतिरिक्त कढीपत्ता केसांना आतून पोषण देण्यास मदत करते आणि केसांची वाढ चांगली होते. 

बदाम

बदाम बायोटीनं परीपूर्ण असतात. बदामाच्या सेवनानं केस दीर्घकाळ काळे राहण्यास मदत होते. याशिवाय बदाम खाल्ल्यानं स्काल्पवर केराटीन प्रोडक्शनही वाढते ज्यामुळे केस मजबूत होतात.

Web Title: Top 5 Foods To Darken Premature White Hairs : Which Food Items Helps To Darken Premature White Hairs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.