Join us  

कलिंगड खा आणि उरलेल्या कलिंगडाचे करा ३ फेसपॅक, चेहरा चमकेल आणि उजळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2023 12:28 PM

Top Watermelon Refreshing Face Packs for the Summers कलिंगडाचा फेसमास्क चेहरा हायड्रेट ठेवेल, व मुरूम, टॅनिंगच्या समस्येपासून सुटका होईल

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. शरीर जर डीहायड्रेट झालं तर, अनेक समस्या उद्भवतात. भरपूर पाणी यासह फळे खाणे गरजेचं आहे. शरीरासह त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणांपासून सरंक्षण करणे तितकंच महत्वाचं आहे. यासाठी आपण कलिंगडाचा वापर करू शकता.

कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.  त्यामुळे कलिंगडमध्ये हे काही पदार्थ मिसळून फेसमास्क बनवा. या फेसमास्कमुळे चेहरा तुकतुकीत फ्रेश दिसेल. यासह उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या टॅन, कोरडी त्वचा, चेहऱ्यावर रेड रॅशेस, या सगळ्या समस्यांपासून  सुटका मिळेल(Top Watermelon Refreshing Face Packs for the Summers).

मुरुम दूर करण्यासाठी कलिंगड फायदेशीर

कलिंगड आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. यासाठी कलिंगडाचा रस कॉटन बॉलच्या मदतीने चेहऱ्यावर लावल्याने, त्वचेची जळजळ आणि लालसरपणापासून आराम मिळतो. कलिंगडमध्ये पाण्यासोबत अँटी-ऑक्सिडेंट, मल्टीविटामिन्स आणि मिनरल्स आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लायकोपीन असते, जे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून दूर ठेवते. याशिवाय कलिंगडमध्ये व्हिटॅमिन ए आणि पेंथोटिक अॅसिड आढळते, ज्यामुळे निस्तेज त्वचा उजळते.

चेहरा काळवंडलाय? टॅनमुळे चेहरा खराब दिसतो? दूध - साखरेचा बनवा ब्राईटनिंग जेल, १० मिनिटात निखळ त्वचा

अशा पद्धतीने करा कलिंगडाचा वापर 

कलिंगड, मध आणि दही मास्क

सर्वप्रथम, एका वाटीमध्ये कलिंगड मॅश करा. त्यात मध आणि दही मिसळा. मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. हे फेसमास्क १० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आपण या फेसमास्कचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

उन्हाळ्यात डोक्याला फार घाम येतो, केस चिपचिपे होतात, दुर्गंधीही येते? ४ घरगुती उपाय, चिकचिक कमी

कलिंगड आणि टोमॅटोचा मास्क

त्वचेवर नितळ तेज मिळवण्यासाठी हा फेसमास्क उपयुक्त ठरेल. यासाठी कलिंगड मॅश करून घ्या, त्यात मॅश केलेला टोमॅटो मिक्स करा. हे मिश्रण चांगले मिक्स करा, व १० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. 

कलिंगड आणि केळी मास्क

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये कलिंगड मॅश करा, त्यात केळी मिक्स करून मिश्रण चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावून ठेवा, २० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी