Join us  

तुरटीचा इवलासा खडा त्वचेवर अशी करेल जादू, दिवाळीत त्वचा चमकेल-नव्या दिसाल तुम्ही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2024 6:15 PM

One Simple Ways In Which You Can Use Alum For Skin Care : Top Way To Use Alum Powder Fitkari For Lightening Dark Spots Acne Scars : त्वचा मुलायम, स्वच्छ आणि नितळ दिसावी यासाठी खास तुरटीचा फेसमास्क...

तुरटी, जवळजवळ आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात असतेच. रोजच्या अनेक छोट्या - मोठ्या कामांमध्ये तुरटीचा वापर केला जातो. याच तुरटीचा वापर करून आपण आपलं सौंदर्य वाढवू शकता. दिसायला एखाद्या पांढऱ्या दगडाप्रमाणे असणारी तुरटी खूपच गुणकारी असते. यामध्ये अनेक औषधीय गुणधर्म असतात. जुन्या काळात सौंदर्यांसाठी तुरटीचा वापर केला जायचा. तुरटीचा वापर करून चेहरा आणि केस या दोन्हींचे सौंदर्य वाढवता येते. तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे अनेक समस्यांवर फायदेशीर ठरतात(One Simple Ways In Which You Can Use Alum For Skin Care).

पावसाळ्यात गढूळ झालेले पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी पाण्यात फिरविली जाते. परंतु याशिवाय तुरटीचे अनेक उपयोग आहेत. तुरटीचा वापर त्वचेसाठी अनेक प्रकारे करता येतो. बदलत्या ऋतुसोबत त्वचेची समस्या अनेकांसाठी त्रासदायक ठरते. वेगवेगळ्या कारणांमुळे बहुतेक लोक त्वचेशी संबंधित समस्यांनी हैराण आहेत. आपली त्वचा मुलायम, स्वच्छ आणि नितळ दिसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी काहीजण महागड्या ट्रिटमेंट्स व इतर स्किन केअर प्रॉडक्ट्सचा वापर करतात. बाजारात उपलब्ध असलेल्या या औषधी आणि सौंदर्य(Beauty Secrets Of Alum: How It Benefits Your Skin) उत्पादनांचा आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी आपण काही घरगुती उपाय करून त्वचा निरोगी आणि चांगली ठेवू शकतो. तसेच हे घरगुती उपाय करण्यासाठी लागणारे साहित्य अगदी कमी किमतीत आणि सहज उपलब्ध होते. त्वचेच्या आरोग्यासाठी तुरटीचा वापर नेमका कसा करावा ते पाहूयात(Top Way To Use Alum Powder Fitkari For Lightening Dark Spots Acne Scars).

साहित्य :- 

१. तुरटीची पावडर - १ टेबलस्पून २. बेसन - २ टेबलस्पून  ३. गुलाब पाणी - ४ टेबलस्पून ४. दूध - गरजेनुसार 

 तुरटीचा फेसमास्क कसा करायचा ? 

सगळ्यातआधी एका बाऊलमध्ये तुरटीची पावडर, बेसन, गुलाब पाणी घेऊन ते सगळे चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. त्यानंतर त्यात गरजेनुसार हळुहळु दूध घालत राहावे. दूध घातल्यानंतर चमच्याने हलवून या मिश्रणाची स्मूद पातळसर पेस्ट तयार करून घ्यावी. तुरटीचा फेसमास्क स्किनवर लावण्यासाठी तयार आहे. 

नखांवरचं नेलपेंट झटपट काढायचंय, ही पाहा अफलातून ट्रिक- नेलपेंट काढा कापूसही न वापरता...

चेहरा सतत ड्राय-कोरडा दिसतो? क्रिती सेनॉन सांगते या खास'पांढऱ्या' फेसमास्कची कमाल-चेहरा चमकतो सतत...

हा फेसमास्क कसा वापरायचा ? 

हा तुरटीचा फेसमास्क तयार झाल्यानंतर तो आपल्या त्वचेवर लावून घ्यावा. त्यानंतर किमान १० ते १५ मिनिटे किंवा हा फेसमास्क संपूर्णपणे सुकेपर्यंत त्वचेवर तसाच लावून ठेवावा. १५ मिनिटांनंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. आठवड्यातून १ ते २ वेळा आपण हा तुरटीचा फेसमास्क स्किनवर लावू शकता.    

हा फेसमास्क वापरताना लक्षात ठेवा... 

१. तुरटीचा जास्त वापर केल्यास आपली त्वचा कोरडी पडू शकते. यासाठीच हा फेसमास्क आठवड्यातून जास्तीत जास्त फक्त दोनचवेळा वापरावा. २. हा फेसमास्क वापरण्यापूर्वी आधी पॅच टेस्ट करून घ्या. जर पॅच टेस्ट केलेल्या भागात खाज किंवा त्वचा लाल झालेली दिसली तर हा फेसमास्क वापरणे टाळा. ३. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची स्किन ऍलर्जी किंवा स्किन प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा फेसमास्क वापरू नका. 

अलायाला आवडणारा लाल फेसमास्क पाहा, चेहरा काळवंडला असेल तर चटकन होईल फ्रेश आणि चमकदार...

तुरटीचा फेसमास्क वापरण्याचे फायदे... 

१. तुरटीमध्ये असे काही गुण असतात जे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल दूर करण्यास मदत करतात. याने ऑयली स्कीनची समस्या दूर होते आणि चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा धोकाही कमी होतो. 

२. तुरटीमध्ये अ‍ॅंटीसेप्टिक गुण असतात जे पिंपल्स निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतात. सोबतच तुरटी अतिरिक्त सीबम उत्पादन नियंत्रित करू शकतं. जे पिंपल्स एक मुख्य कारण आहे. 

३. तुरटीने त्वचेवरील छिद्र टाइट करण्यास मदत मिळते. ज्यामुळे त्वचा आणखी तजेलदार आणि चमकदार दिसते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी