असे म्हणतात, केसांमुळे चेहऱ्यावरील सौंदर्य वाढते. मात्र, बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे केसांकडे हवे तसे लक्ष द्यायला जमत नाही. केसांची निगा राखण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स मिळतात. पण काही प्रॉडक्ट्स उपयुक्त तर काही फेल ठरतात. केस गळती, केसात कोंडा, केस अकाली पांढरे होणे, या समस्यांमुळे अनेक लोकं त्रस्त आहे.
मुख्य म्हणजे केस विंचरल्यानंतर हातात केसांचा झुपका येतो. ज्यामुळे टक्कल पडण्याची देखील भीती असते. केसांची निगा राखण्यासाठी केसांना पोषण मिळेल, असे काही आहारात बदल करणं गरजेचं आहे. यासाठी आहारात अशा काही सीड्सचा समावेश करा, ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या सुटतील(Trust these 3 seeds to boost hair growth, prevent hair fall).
मेथीचे दाणे केसांसाठी वरदान
आयुर्वेदात मेथीच्या दाण्यांना खूप महत्त्व आहे. मेथीमध्ये नियासिन, पोटॅशियम, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी, लोह इत्यादी मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे केसांना याचा खूप फायदा होतो. यासाठी एका वाटीत २ चमचे मेथी दाणे पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी मेथी दाणे चावून खा, व त्यानंतर याचे पाणी प्या. मेथीमध्ये आयरन असते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. नियमित भिजवलेले मेथी दाणे खाल्ल्याने केसांच्या अनेक समस्या सुटतात.
केस पातळ - निर्जीव दिसतात? केसांवर लावा ४ प्रकारचे तेल, केस दिसतील काळेभोर - घनदाट
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने केसांची वाढ सुधारते. यासह केस आणि चेहऱ्यावरही चमक येते. भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. आपण भोपळ्याच्या बिया ड्रायफ्रुट्स किंवा भाज्यांमध्ये मिक्स करून खाऊ शकता.
फेस वॉश करताना ४ चुका करणे टाळा, अनेक स्किन प्रॉब्लेम्स सुटतील, चेहरा दिसेल क्लिन - फ्रेश
अळशीच्या बिया
अळशीच्या बियांमध्ये प्रथिने, ओमेगा, फॅटी ऍसिडस् यांसारखे पोषक घटक आढळतात. अळशीच्या बिया रोज खाल्ल्यास केसांनाच नाही तर चेहऱ्यालाही फायदा होतो. मुख्य म्हणजे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते.