Join us  

मान खूप काळवंडली आहे ? पपई आणि दह्याचा करा सोपा उपाय, मान दिसेल स्वच्छ-नितळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2023 8:39 PM

Natural Home Remedy For Dark Neck : फेशियल केलं तरी मानेचा काळपटपणा जात नाही, हा सोपा उपाय करुन पाहा

चेहऱ्याच्या त्वचेप्रमाणेच मानेच्या त्वचेचीही विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, सुंदर चेहरा असला तरी काळी पडलेली मान असेल तर ते खराब दिसतं. प्रदूषणामुळे चेहरा निस्तेज होतो आणि मानेचा रंगही बदलाय लागतो. कधीकधी मानेवर काळसर डाग पडतात जे सहजासहजी जात नाहीत. चेहर्‍यासोबतच शरीराचा इतर भागही चमकदार दिसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु काही लोकांच्या मानेवर टॅनिंग किंवा काळेपणा येतो. मानेचा हा काळपटपणा दूर करणे सहज शक्य होत नाही. बाजारांत अनेक सौंदर्य उत्पादने येतात, ज्यात टॅनिंग दूर करण्याचा दावा केला जातो, परंतु प्रत्यक्षात टॅनिंग झटपट दूर करता येत नाही, परंतु काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे ही समस्या हळूहळू दूर होऊ शकते.

मानेच्या या काळपटपणामुळे आपल्या एकूणच व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम दिसून येतो. बरेचदा आपण ही काळी पडलेली मान साबण व पाण्याचा वापर करुन स्वच्छ तर करतो. परंतु केवळ असे केल्याने मानेवरचा काळपटपणा पाहिजे तितका दूर होत नाही. मान काळी पडू नये म्हणून आपण अनेक उपाय करून बघतो तरीही त्याचा काहीच उपयोग होत नाही. मानेवरचा काळपटपणा कायमचा दूर करण्यासाठी आपण कच्च्या पपईची मदत घेऊ शकता. कच्च्या पपईमध्ये काही एंजाइम असतात जे त्वचेवर ब्लीचसारखे काम करतात. यासाठी मानेचा काळपटपणा दूर करण्यासाठी कच्च्या पपईचा मास्क कसा तयार करावा हे पाहूयात(Try these 3 ingredients homemade pack to lighten your dark neck).

अशा प्रकारे कच्च्या पपईने नेक टॅनिंग रिमूव्हल मास्क बनवा :- 

साहित्य:-

१. कच्च्या पपईचा तुकडा - १/४ कप २. दही - १ टेबलस्पून ३. गुलाब पाणी - १ टेबलस्पून 

कोण म्हणतं सेंन्सिटिव्ह स्किन असेल तर हळद लावू नये? हळदीसारखे इफेक्टिव्ह काही नाही कारण...

नेक टॅनिंग रिमूव्हल मास्क नेमका कसा बनवावा ? 

१. सर्वप्रथम कच्च्या पपईची साल सोलून घ्यावी त्यानंतर त्याचे लहान लहान तुकडे करून ते मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट तयार करवून घ्यावी. २. आता ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घेऊन त्यात दही व गुलाब पाणी मिसळून घ्यावे. ३. त्यानंतर हे सगळे पदार्थ चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावे. 

क्रांती रेडकरच्या हायड्रा फेशियलची चर्चा, हे हायड्रा फेशियल नक्की असतं काय ?

आपला नेक टॅनिंग रिमूव्हल मास्क मानेवर लावण्यासाठी तयार आहे.  

चेहऱ्यावर करा बटाटा आइस क्यूबची जादू, चेहऱ्यावर येईल कधीही न आलेली सुंदर चमक...

नेक टॅनिंग रिमूव्हल मास्क मानेवर कसा लावावा ?

हा नेक टॅनिंग रिमूव्हल मास्क मानेच्या काळपट झालेल्या भागावर ब्रशच्या मदतीने पसरवून लावून घ्यावा. त्यानंतर २० मिनिटे हा मास्क मानेवर तसाच लावून ठेवावा. आता हात हलके ओले करा आणि बोटांनी हळूहळू मानेवर स्क्रब करा. २ मिनिटे स्क्रब केल्यांनतर मान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. हा उपाय आठवड्यातून दर दोन दिवसांनी करावा. यामुळे मानेवरील सर्व घाण काही वेळात नाहीशी होईल आणि एका आठवड्यात मान स्वच्छ होऊन चमकू लागेल.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स