Join us  

कॉलर बोन दिसावं असं वाटतं? मग आजपासूनच सुरु करा ५ सोपे व्यायाम, खांदे दिसतील खूप सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2023 5:06 PM

Try these 5 intense shoulder exercises to get a sexy and shapely collarbone आपले कॉलर बोन्सच दिसत नाही असं दु:ख अनेकींना असतो, त्यासाठीच हे ५ व्यायाम

आपण अनेक अभिनेत्रींना पाहिलं असेल जे, ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करून कॉलर बोन फ्लॉन्ट करतात. त्यांना पाहून आपल्याला देखील कॉलर बोन फ्लॉन्ट करण्याची इच्छा होते. पण अनेक जणींच्या शोल्डरभोवती चरबी जमा होते. ज्यामुळे कॉलर बोन दिसून येत नाही. कॉलर बोनमुळे आपण अधिक आकर्षक दिसतो. याला ब्यूटी बोन असे देखील म्हणतात.

काही लोकं व्यायाम शाळेत जाऊन विविध व्यायाम करून, कॉलर बोन फ्लॉन्ट करण्याचा प्रयत्न करतात. जर आपल्याला देखील बी - टाऊन अभिनेत्रींप्रमाणे कॉलर बोन हवं असेल तर, या ५ एक्सरसाइज करून पाहा. यामुळे कॉलर बोनवरील चरबी कमी होईल. व आपल्याला ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये कॉलर बोन फ्लॉन्ट करण्याची इच्छा पूर्ण होईल(Try these 5 intense shoulder exercises to get a sexy and shapely collarbone).

या व्यायामांमुळे ब्युटी बोनवरील अतिरिक्त चरबी कमी होईल

जॉगिंग

जॉगिंग केल्याने आपल्या संपूर्ण शरीराचे वजन कमी होते. जॉगिंग केल्याने कॅलरीज तर बर्न होतातच, यासह शरीरातील अनेक अवयांवरून चरबी कमी करण्यास मदत होते. नियमित जॉगिंग केल्यामुळे बॉडी टोन्ड होते. ज्यामुळे आपण सुडौल व फिट दिसतो. यासह शोल्डरवरील चरबी कमी होते. ज्यामुळे कॉलर बोन दिसून येते.

केसातल्या कोंड्याचा वैताग आलाय? जावेद हबीब सांगतात, शाम्पूत मिसळून लावा १ गोष्ट, कोंडा गायब

शोल्डर रोल

कॉलर बोन दिसावा असे वाटत असेल तर, शोल्डर रोल हा व्यायाम करून पाहा. एक सारखं बसून संगणकावर काम केल्यामुळे, आपले खांदे पुढच्या दिशेने वाकले जातात. दिवसातून १५ ते २० वेळा शोल्डर रोल हा व्यायाम केल्याने, शोल्डरवरील अतिरिक्त चरबी कमी होते. ज्यामुळे कॉलर बोन दिसून येतात. यासाठी आपले दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत वर उचलून घडाळ्याच्या काट्याप्रमाणे गोलाकारात फिरवा.

शोल्डर श्रग

आपल्याला जर कॉलर बोन फ्लॉन्ट करायचं असेल तर, शोल्डर श्रग्स हा व्यायाम करून पाहा. हा व्यायाम दिवसातून १५ ते २० वेळा करा. जेणेकरून शोल्डरवरील चरबी वितळेल. व खांदा देखील ताठ होईल. यामुळे कॉलर बोन ठळक दिसून येईल. यासाठी दोन्ही हातात डंबेल्स घ्या, त्यानंतर खांदा अलगद वर उचला व खाली सोडा.

१ चमचा कॉफी आणि अर्धा बटाटा, करून पाहा खास फेसपॅक - उन्हाने आलेले टॅनिंग - सुरकुत्या गायब

पुश - अप्स

दिवसातून १५ ते २० वेळा पुश - अप्स केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यामुळे पोटावरील यासह खांद्यावरील अतिरिक्त चरबी कमी होते. हा व्यायाम केल्याने हात आणि पाठीवरचा भाग मजबूत होतो. यासह कॉलर बोन देखील दिसून येते. यासाठी दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकवा, त्यानंतर पायांची बोटे सरळ ताठ ठेवा. संपूर्ण शरीराचा भार हातांच्या पंज्यावर व पायांच्या बोटावर ठेवून शरीर वर - खाली उचला.

स्विमिंग

कॉलर बोन फ्लॉन्ट करण्यासाठी आपण स्विमिंग हा व्यायाम करू शकता. नियमित स्विमिंग केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होतेच, यासह हात आणि खांदे देखील मजबूत होतात. शोल्डरवरील चरबी कमी होते, ज्यामुळे कॉलर बोन ठळक दिसून येतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स